शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचे अंथरुण अन् आकाशाचे पांघरुण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:43 IST

‘एक प्रकल्प-एक न्याय’ अशी न्याय्य मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसावलेल्या ५०० पेक्षा अधिक प्रकल्पबाधितांना सोमवारची रात्र ‘जमिनीचे अंथरुण अन आकाशाचे पांघरुण' अशा स्थितीत काढावी लागली.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांच्या वेदना : मत मागण्यासाठी येता ना? मग मागण्या पूर्ण करण्यासाठी का येत नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘एक प्रकल्प-एक न्याय’ अशी न्याय्य मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसावलेल्या ५०० पेक्षा अधिक प्रकल्पबाधितांना सोमवारची रात्र ‘जमिनीचे अंथरुण अन आकाशाचे पांघरुण' अशा स्थितीत काढावी लागली.न्याय्य मोबदल्यासाठी निर्धारपूर्वक एकत्रित आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. अंगावरच्या कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हते. विभागीय आयुक्तांनी टोलवाटोलवी केल्याने प्रकल्पबाधित संतापले. रात्री अचानक त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा निर्धार केला.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, आंदोलकांची खंतमग काय, रस्त्यावरच भलामोठा तडव अंथरण्यात आला. भोजनाची समस्या उभी ठाकली. वर्गणी करून मसाला भात करण्यात आला. पुरुषांनी एकमेकांशी बोलत अख्खी रात्र जागून काढली. मात्र, वृद्ध महिला थंडीने कुडकुडत राहिल्या. रात्री एक ते दीडच्या सुमारास आंदोलनकर्त्यांपैकीच काहींनी नातेवाईकांचे घर गाठून मिळेल तितक्या पांघरूणाची सोय केली. सोमवारच्या रात्री राजकीय वा सामाजिक मंडळी आंदोलनकर्त्यांच्या मदतीसाठी धावली नाही. लोकप्रतिनिधीही आले नाहीत. ती खंत मंगळवारी कृती समिती व प्रकल्पबाधितांनी बोलून दाखविली.प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला तगडा बंदोबस्तबळीराजा प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडलेल्या ठिय्या आंदोलनाला पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. दोन पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, ४१ पोलीस कर्मचारी, ९ महिला पोलीस, एक आरसीपी प्लाटून असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातही दोन पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, ३९ पोलीस कर्मचारी, १३ महिला पोलीस तैनात करण्यात आले आहे. मोर्चा अडविणे, लोखंडी मेन गेटवर थांबणे, चेम्बर मागे थांबणे, रहदारी नियंत्रण व व्हिडिओ शुटींग, अशी जबाबदारी बंदोबस्तात तैनात असणाऱ्या पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहाचा वापरआंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी असल्याने किमान एक फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी कृती समितीने केली. मात्र, प्रशासनाने सहकार्य केले नाही. त्यामुळे मंगळवारी पहाटे आंदोलकर्त्यांना जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागला. मात्र, पाणी संपल्याने आंदोलनकर्त्याची कुचंबणा झाली.तर मते मागायला येऊच नका !मते मागण्यासाठी आमच्या दारी येता ना, मग आता मागण्या पूर्ण करण्यासाठी का पुढे येत नाही, असा सवाल प्रकल्पग्रस्तांचा आहे. आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही निवडणुकीत मत देणार नाही. आमच्या दारी येऊच नका, असा इशारा प्रकल्पगस्तांनी दिला.प्रकल्पग्रस्तांनी केली वर्गणी, सामूहिक भोजनरात्रभर ठिय्या दिलेल्या २०० महिला व ४०० पेक्षा अधिक पुरुष प्र्रकल्पग्रस्तांनी सांघिकरीत्या परस्परांची काळजी घेतली. वर्गणी करून सिलिंडर व भट्टी भाड्याने आणली. रस्तावरच पंगती पार पडल्या. मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दुपारचे भोजन केले गेले.दीड लाखाने पैसे दिले आणि आता ११-१२ लाखांनी? हा अन्यायच आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत येथून हलणार नाही. आता निर्णय लागेपर्यंत येथेच तढवावर झोपायचे. ना अंथरुण, ना पांघरुण.- वंदना हरिदास पवारवासनी, वासनी प्रकल्पआम्हाला सात-आठ वर्षांपूर्वी एकरी एक लाख रुपये जमिनीचा मोबदला मिळाला. आता १२ ते १३ लाख रुपयांप्रमाणे दिला जात आहे. एकाच गावातील बाधितांना वेगवेगळा न्याय का ? ही फसवणूक नव्हे तर दरोडाच!- अरुणा घोम,कोंडवर्धा, बोर्डीनाला प्रकल्पआंदोलनात सहभागी माता-भगिनी थंडीत कुडकुडत असताना रात्री दीडच्या सुमारास भाड्याने चादरी व ब्लँकेट आणण्यात आले. मंगळवारी पहाटे तर प्रशासनाने अंतच पाहिला. सुविधा उपलब्ध नसल्याने प्रात:विधीसाठी महिलांची मोठी कुचंबणा झाली.- संदीप मेटांगेपेढी प्रकल्पग्रस्तलोकप्रतिनिधी अद्यापही फिरकले नाहीत. प्रशासनाने कुठलेही सहकार्य केले नाही. आता निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणीच हवी. आंदोलनकर्ते जे ठरवतील, तो पुढचा मार्ग असेल. हे मात्र खरे की, आता माघार नाहीच. हे अंतिम आणि निर्णायक आंदोलन असेल.- मनोज चव्हाण, कृती समिती