अमरावती : जागेच्या वादातून एका इसमाला चार जणांनी मारहाण करून चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ३० मे रोजी नांदगाव पेठ हद्दीतील रहाटगाव स्थित माळीपुऱ्यात उघडकीस आली. प्रभाकर गोविंद खरबडे (५२ रा. माळीपुरा) यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी संतोष त्र्यंबक खडसे (३५), विवेक राजू खडसे (२६), पवन मनोहर खडसे (२८, सर्व रा. माळीपुरा, रहाटगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
000000000000000000000000000
पाच ठिकाणच्या अवैध दारू अड्ड्यावर धाडी
अमरावती: शहर पोलिसांनी रविवारी पाच अवैध दारू अड्ड्यांवर धाड टाकून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गाडगेनगर पोलिसांनी महात्मा फुलेनगरात एमएच २७ बी ७९३० क्रमांकाच्या दुचाकीवरून जाणारे संतोष लक्ष्मण यादव व करण सुखदेव यादव (दोन्ही रा. छत्रसालनगर) यांच्याककडून ७ हजार २३० रुपयांची विदेशी दारू जप्त केली. नागपुरी गेट पोलिसांनी नागोबा ओट्याजवळ सागर नरेश डोनारकर (२५) याच्या ताब्यातून ७८० रुपयांची दारू जप्त केली. राजापेठ पोलिसांनी जुन्या बायपास मार्गावर अमोल बाबाराव मुंदे (३१, रा. आदर्शनगर) याच्या ताब्यातून तीन हजारांची दारू जप्त केली. खोलापुरी गेट पोलिसांनी महाजनपुऱ्यातून शेषराव वसंत खंडेराव याच्याकडून १ हजार २४८ रुपयांची दारू जप्त केली. आनंदनगरातून पंजाब गुलाब लोखंडे याच्या ताब्यातून ६०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
00000000000000000000000
खड्ड्यात आढळला इसमाचा मृतदेह
अमरावती : वलगाव ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपासमोर एका खड्ड्यात रविवारी ४२ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. सचिन गोवर्धन मोहड (रा. वलगाव) असे मृताचे नाव आहे. पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याला मृतदेह निदर्शनास आला. वलगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.