शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:06 IST

------------------------ दुचाकीच्या धडकेत वृद्धा जखमी परतवाडा : भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून वृद्धेला जखमी केल्याची घटना ८ जुलै रोजी ...

------------------------

दुचाकीच्या धडकेत वृद्धा जखमी

परतवाडा : भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून वृद्धेला जखमी केल्याची घटना ८ जुलै रोजी घडली. यामध्ये डोक्याला मार लागल्याने इर्विन रुग्णालयात भरती केले असता, उपचारादरम्यान तिला मृत्यू झाला. राजेश लखपती यांच्या तक्रारीवरून एमएच २७ सीयू ३०७० चा दुचाकीस्वार दत्ता मुरलीधर लखपतीविरुद्ध परतवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

------------------

लॉक केलेले चारचाकी वाहन लंपास

वरूड : मुसळखेडा ग्रामपंचायतीच्या जागेवर लॉक करून ठेवलेले चालचाकी वाहन अज्ञाताने लंपास केल्याची घटना ३० जुलै रोजी उघड झाली. आश्विन रामभाऊ रामदे (३५, रा. सावंगी) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहे.

------------------------

क्षुल्लक कारणावरून भावाला उभारीने मारहाण

वरूड : आईच्या नावाने मिळालेले ५ हजार रुपये का दिले नाही, यावरून शिवीगाळ करून भावाला बंडीच्या उभारीने मारहाण करण्यात आली. ही घटना चांदस येथे ३१ जुलै रोजी दुपारी घडली. हरीचंद सालोडे यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी लिलाधर रामराव सालोडे (४०) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

अवैध रेती नेताना ट्रॅक्टरसह रेती जप्त

वरूड : अवैध रेती वाहन नेताना आढळलेल्या ट्रॅक्टरसह दीड ब्रास रेती जप्त करण्यात आली. ही कारवाई वरूड पोलिसांनी ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान जायंट्स चौकात केली. आरोपी चंद्रशेखर नत्थुजी परतेती (२६, रा. खारीपुरा) किसन तिरपुडे (३७, रा. धनोडी)विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

मोर्शी : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ केल्याची घटना महात्मा फुले नगर नवसारी मार्गावर घडली. तसेच लग्नात टीव्ही, सोपा, दिवाण, वाॅशिंग मशीन माहेरहून आणण्याची मागणी ३३ वर्षीय विवाहितेने पूर्ण न केल्याने व मुलगी झाल्याने तिला छळ चालविल्याचे तिने मोर्शी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुल सुरेश तायडे, सुरेश रायभान तायडे, जयप्रकाश तायडे, नीलेश तायडे, संदीप तायडे, ममता प्रदीप खंडारे (सर्व रा. महात्मा फुलेनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------

भरधाव ट्रकची मुलीला धडक

आसेगाव पूर्णा : भरधाव व निष्काळजीपणे येणाऱ्या ट्रकचालकाने रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या मुलीला धडक दिल्या घटना २९ जुलै रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. एकनाथ देवीदास तट्टे यांच्या तक्रारीवरून एमएच ३४ बीजी ३२७९ या ट्रकचालकाविरुद्ध आसेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-----------------------

डोक्यावर वीट मारून जखमी केले

वाठोडा शुक्लेश्वर : घरासमोर येऊन शिवीगाळ केल्याने हटकले असता, डोक्यावर वीट मारून जखमी करण्यात आले. ही घटना ३१ जुलै रोजी येथे दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. समीर अहमद जफर अहमद (२५) यांच्या तक्रारीवरून खोलापूर पोलिसांनी मिराजुद्दीन सलिमुद्दीन, मो. समीर मिराजुद्दीन, मो. फिरोज फयाजुद्दीन, मो. अंसार फयाजुद्दीन (रा. वाठोडा शुक्लेश्वर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------

समजवण्यास गेलेल्या दोघांना मारहाण

खोलापूर : भांडणात मध्यस्ती करण्यास गेलेल्या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना वाठोडा शुक्लेश्वर येथे दुपारी १२ च्या सुमारास घडली. फिरोजुद्दीन फयाजुद्दीन यांच्या तक्रारीवरून खोलापूर पोलिसांनी जियाउद्दीन मो. आरीफ, फजल मो. आरीफ, समीर अहमद जफर अहमद, सर्फराज जफर अहमदविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

एकतर्फी प्रेमातून युवतीचा विनयभंग

चिखलदरा : एकतर्फी प्रेम करून लग्नाची गळ घालत युवतीचा विनयभंग करून युवतीच्या वडिलांना मारहाण केल्याची घटना चिखलदरा पोलीस ठाण्यांतर्गत ३१ जुलै रोजी घडली. युवतीच्या तक्रारीवरून अजय वासुदेव मुंडे, सहदेव वासुदेव मुंडे, वासुदेव मुंडे, (रा. रजनीकुंड) व महेंद्र पाटणकर (चुरणी) विरुद्ध गुन्हा नोंदविला, सहदेव मुंडे यांच्या तक्रारीवरून सचिन शंकर रेचे, शंकर रेचे, कमला शंकर रेचे (रा. रजनीकुंड) विरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविला.

--------------