शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

सावधान ! कार्बाईडच्या वापराने जिवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:22 IST

सावधान कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेले आंबे, केळी खालल्याने जीवघेणा आजार होत आहे.

पावसाळ्यातही विक्री सुरूच : एफडीए झोपतचअमरावती : सावधान कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेले आंबे, केळी खालल्याने जीवघेणा आजार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून पावसाळयातही कार्बाईडच्या आंब्यांची जोरात विक्री करण्यात येत आहे. हजारो किंटल आंबे अंबानगरीत रोज विकले जात असून तेवढीच केळीसुध्दा विकली जात आहेत.हार्डवेअरच्या दुकानात सहज उपलब्ध होणारे शेकडो किलो कार्बाईड आंबे पिकविण्यासाठी फळविक्रेते वापरत आहेत. अत्यंत घातक असा कर्करोग या आंब्यापासून होतो. सामान्य नागरिकांना या विषाबाबत साधी कल्पनाही नसते. आपण लहान मुलांसाठी जी फळे बाजारातून नेत आहोत ती फळे विषयुक्त आहेत. फळेविक्रेते कोटयावधी रूपये कमविण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी रोज खेळत आहेत. मात्र, नागरिकांना चांगली फळे ते विकत नाहीत. येथील बाजार समिती परिसरात अनेक नोंदणीकृत फळांचे व्यापारी आहेत. येथूनच संपूर्ण अमरावती शहराला फळे विक्रीकरिता वितरित केली जातात. काही आंबे कार्बाईडने पिकविण्यात येतात तर आंबे व केळी पिकविण्यासाठी जास्त प्रमाणात ईथेलीन गॅसचा वापरही करण्यात येतो. अंबानगरी ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आहे. येथील नागरिक जागृत आहेत. त्यामुळे अनेक जबाबदार नागरिकांनी आंबे खाण्याचे टाळले आहे. अंबानगरीत कार्बाईडने पिकविलेले आंबे विकले जात आहेत. केळी पिकविण्यासाठी ईथेलीन गॅसचा अधिक प्रमाणात वापर केला जात आहे. सफरचंदवर व्हॅक्स (मेणाचे थर) लावले जात आहे. खुलेआम जीवघेण्या गुटख्याची विक्री सुरु आहे. त्यामुळे अमरावतीत अन्न व सुरक्षा मानदे कायद्याची अंमलबजावणी होत आहे की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. मात्र निष्क्रिीय अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट व एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी मोकाट का सोडले व त्यांच्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना अभय का, असा प्रश्न आता जनता विचारत आहे. विषयुक्त फळांपासून अमरावतीकरांना तातडीने मुक्ती देण्याची मागणी होत आहे.