संघर्षाची शक्यता : १५ छुप्या कॅमेऱ्यांची जंगलावर नजर अमरावती : शहरालगतच्या जंगलात वाघाचा मुक्तसंचार आढळून आल्याने नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. वनविभागाच्या १५ छुप्या कॅमेऱ्यांची जंगलावर नजर आहे. मात्र, मानव- वन्यप्राणी संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोर अभयारण्यातून आलेला पट्टेदार वाघ पोहऱ्याच्या जंगलात मुक्तसंचार करताना अनेकदा आढळून आला आहे. नुकताच तो शहरानजीक १० ते १२ किलोमिटर अंतरावर दृष्टीस पडला. त्यामुळे जंगल मार्गाने जाणाऱ्यांनी तसेच जंगल भ्रमंती करणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. चांदूररेल्वे मार्गावरील जंगलाशेजारी अनेक गावे असून जंगलात या ना त्या कारणाने गावकऱ्यांना दररोज जावेच लागते. वाघ आसपासची परिस्थिती व मानवाच्या उपस्थितीनुसार स्थान बदलतो. त्याचा नैसर्गिक स्वभाव, त्याचे अधिकारक्षेत्र सपूर्ण जंगल असते. तो संपूर्ण जंगलावर अधिकार गाजवितो. इतर वन्यपशुंवर दबदबा कायम ठेवण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते.
सावधान ! जंगलाच्या राजाचा मुक्तसंचार
By admin | Updated: December 22, 2015 00:08 IST