शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सावधान! खात्यातून रोख होऊ शकते गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:34 IST

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँक खात्यातूनच थेट ८० हजारांची रोख काढून घेण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी कोतवाली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

ठळक मुद्देबँकेतील ८० हजार लंपास : सायबर गुन्ह्याच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँक खात्यातूनच थेट ८० हजारांची रोख काढून घेण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी कोतवाली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. आठ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यामुळे सायबर गुन्ह्याच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान आहे.कस्बेगव्हाण येथील रहिवासी अरविंद सीताराम हाडोळे नामक इसमाचे कुटुंबीय श्रीकृष्ण पेठ परिसरात हल्ली मुक्कामास आहेत. ते शाम चौकातील स्टेट बँक आॅफ इंडियाचे खातेदार असून त्यांच्याकडे एटीएम कार्ड आहे. मंगळवारी सकाळी हाडोळेंच्या मोबाईलवर अचानक ८० हजार रुपये विड्रॉल झाल्याचे संदेश प्राप्त झाला. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याशी चर्चा केली. साधारणत: सायबर गुन्ह्यातील धागेदोरे हे परराज्यातील आहेत. अज्ञात मोबाईल क्रमांकावरून कॉल करून एटीएमची माहिती मिळविल्यानंतर खात्यातून पैसे काढून घेण्याचे अनेक गुन्हे पोलिसांकडे नोंदविले जातात. मात्र, कोणीही फेक कॉल करून एटीएम पीन किंवा ओटीपी क्रमांक विचारला नसतानाही बँक खात्यातूनच थेट पैसे काढण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी एसबीआयच्या खातेदारासोबत घडला.बँकरवर कारवाईची शक्यताबॅक खात्यातून पैसे काढण्याच्या प्रकार अधिकारी,कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे होण्याची शक्यता तक्रारकर्ता हाडोळेंनी व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी एसबीआयच्या बॅक अधिकाºयांना चौकशीकरिता बोलाविले होते.आठ दिवसांत दुसरी घटनाआठ दिवसांपूर्वी स्टेट बँक आॅफ इंडियातील एका खातेदारांच्या खात्यातून ८० हजारांचीच रोख काढून घेण्यात आली आहे. याबाबत आयटी अ‍ॅक्टनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मात्र, तपासकार्यात पोलिसांनाही बँकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते प्रकरण थंडबस्त्यात आहे. त्यातच मंगळवारी हाडोळे यांच्या बँक खात्यातून ८० हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.एटीएम 'क्लोन'चा संशयएटीएम क्लोन करून दुसºया एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्याचे प्रकार आता सुरू झाल्याची शंका पोलिसांनी वर्तविली आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावे असणारे सिमकार्ड हरविल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन पोच घेणे आणि त्याच पोचद्वारे त्याच व्यक्तीच्या नावे दुसरे सिमकार्ड कंपनीकडून घेण्याचे फंडा सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे. त्याचप्रकारे ८० हजारांची रोख बँक खात्यातून काढण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांचा आहे.