शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

स्वयंपाकघरातून तांब्याची भांडी हद्दपार

By admin | Updated: May 17, 2015 00:44 IST

प्राचिन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून हद्दपार झाली आहेत़ त्यांची जागा आता ..

आरोग्यासाठी तांबे लाभदायक : आधुनिकतेमुळे वाढतोय स्टेनलेस स्टीलचा वापर धामणगाव रेल्वे : प्राचिन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून हद्दपार झाली आहेत़ त्यांची जागा आता स्टेनलेस स्टील व प्लॅस्टिकच्या भांड्यांनी घेतली आहे़ पूर्वी आरोग्य चांगले राहण्यासाठी तांब्याची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जात असत. सद्यस्थितीत नव्या पिढीने जुना रेडिओ, टीव्ही, जुन्या लाकडी खुर्च्यासह अन्य जुनाट वस्त अडगळीत टाकल्या आहेत. त्याचप्रमाणे वडिलोपार्जित काळापासून वापरली जाणारी तांब्याची भांडी देखील हद्दपार करून आता स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर सर्रास सुरू झाला आहे़ सध्याच्या काळात केवळ गरजेपुुरताच तांब्याच्या भांड्यांचा वापर होताना दिसतो़ देवांसाठी तसेच धार्मिक कार्यात आजही आवर्जून तांब्याची भांडी वापरली जातात. तांबे हा धातू बहुगुणी असून आरोग्यसाठी देखील तो अतिशय उत्तम असल्याचा उल्लेख आयुर्वेदात आहे़ तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने अनेक आजार नाहीसे होतात. प्राचिन काळापासून चालत आलेल्या तांब्याच्या भांड्यांच्या वापरावर विज्ञानानेही शिक्कामोर्तब केले आहे़तांब्याच्या वस्तुंवर विषाणुंची संख्या नव्वद ते शंभर टक्क्यांनी कमी असल्याचे वैज्ञानिक संशोधनात दिसून आले आहे़ अलिकडे मात्र दैनंदिन वापरात स्टील, लोखंड, प्लास्टिकचा वापर वाढला आहे. या वस्तुंवर मोठ्या प्रमाणात विषाणू जमतात़ खाद्यान्नाच्या माध्यमातून ते शरीरात मोठ्या प्रमाणात प्रवेश करून रोगप्रतिकारक शक्तींवर हल्ला करतात़ यामुळे व्यक्ती आजारी पडतात़स्टीलच्या भांड्यांपेक्षा तांब्याचा वापर अधिक होत असलेले स्वयंपाकघर जीवाणुंपासून अधिक सुरक्षित असते़ विज्ञान निरीक्षणानुसार सामान्य तापमानाला तांब्याच्या भांड्यातील जीवाणू चार तासात मरतात़ तर स्टीलच्या भांड्यात ते एक महिन्यापेक्षा अधिक काळ जीवंत राहतात़ आयुर्वेदानुसार नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्राशन केल्यास माणसाचे शरीर तंदुरूस्त राहाते आणि आम्लपित्त, विविध चर्मरोग, सांध्यांचे दुखणे आदी तक्रारीपासून सहज मुक्ती मिळते़ आयुर्वेदात तांब्याचे जलपात्र उत्तम मानले जाते़ त्या खालोखाल मातीचे जलपात्र चांगले मानले आहे़पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, अपचन, भूक न लागणे, बध्दकोष्ठता, अल्सर, आदी तक्रारी असणाऱ्यांना तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने लाभ होतो़ तारूण्यापिटीकांची समस्या देखील दूर होते. चेहऱ्याची कांती सुधारण्यास यामुळे मदत होते़ तांबे हे खाद्यपदार्थातील विषाणुंचा नायनाट करते़ तर पेशींमधील विषद्रव्ये तयार होण्यापासून रोखते. यामुळे जीवाणुंना जिवंत राहणे अवघड बनते़ मात्र, आज बहुतांश घरांच्या स्वयंपाकघरातून स्टेनलेस स्टीलचा वापर वाढला आहे. देव्हाऱ्यात पूजेसाठी एखाददुसरे तांब्याचे भांडे आढळून येते. इतर ठिकाणी स्टिल आणि प्लास्टिकचा वापरच केला जातो. वास्तविक सद्यस्थितीत तांब्याच्या भांड्यांना चांगला दर आहे़ त्यामुळे अशी वाडवडिलांपासून घरात अडगळीत ठेवलेली तांब्याची भांडी मोडीत देऊन नवीन स्टेनलेस स्टीलची भांडी घेण्याच आजच्या पिढीचा कल आहे़तांब्याच्या भांड्यांचा आरोग्यदायी उपयोग अनेकांना माहितच नसल्याने तांब्याची भांडी वापरणे आजकाल कालबाह्य समजले जाते. आरोग्य संवर्धनासाठी नाना प्रयोग करणाऱ्या आजच्या पिढीने तांब्याचे महत्त्व समजून घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा वापर करण्याची गरज आहे़ तांब्याला कालबाह्य न समजता त्याचा वापर अधिकाधिक कल्पकतेने करण्याची गरज आहे.