शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीमुळे बँकाच मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:01 IST

गजानन मोहोड ।आॅनलाईन लोकमतअमरावती : शेतकऱ्यांच्या दीड लाखांच्या कर्जमाफीसह प्रोत्साहनपर योजना व एकरकमी भरणा (ओटीएस) मुळे बँकांचा एनपीए (अनुत्पादित मालमत्ता) कमी होणार आहे. बँकांची सद्यस्थितीत १००७ कोटी ६७ लाखांची थकबाकी आहे, तर ४३७ कोटींची कर्जमाफी बँकाकडे वर्ग करण्यात आली. यात सर्वाधिक फायदा बँकाचा होत आहे. जिल्हा बँकेचा एनपीए हा २० ...

ठळक मुद्देएनपीएमध्ये घट : १००७ कोटींची थकबाकी, जिल्हा बँकेच्या स्थितीत सुधार

गजानन मोहोड ।आॅनलाईन लोकमतअमरावती : शेतकऱ्यांच्या दीड लाखांच्या कर्जमाफीसह प्रोत्साहनपर योजना व एकरकमी भरणा (ओटीएस) मुळे बँकांचा एनपीए (अनुत्पादित मालमत्ता) कमी होणार आहे. बँकांची सद्यस्थितीत १००७ कोटी ६७ लाखांची थकबाकी आहे, तर ४३७ कोटींची कर्जमाफी बँकाकडे वर्ग करण्यात आली. यात सर्वाधिक फायदा बँकाचा होत आहे. जिल्हा बँकेचा एनपीए हा २० टक्क्यांपर्यंत आहे. तो आणखी कमी होणार असल्याने बँकेची आर्थिक स्थिती सुधारेल.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजनेंतर्गत १ एप्रिल २००८ पासून ३० जून २०१६ पर्यंत दीड लाखांपर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. यासाठी जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार शेतकरी खातेदारांनी पोर्टलवर आॅनलाइन अर्ज केलेत. यामध्ये जिल्हा बँकेच्या १ लाख ४ हजार शेतकºयांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या नावाची पडताळणी होऊन तात्पुरत्या पात्र लाभार्थींची यादी आयटी विभागाला पाठविण्यात आली. आतापर्यंत ५० हजार ९८४ शेतकऱ्यांना २१३ कोटी १ लाख रुपयांची रक्कम जिल्हा बँकेच्या खातेदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आली, तर व्यापारी बँकांच्या ३४ हजार १५८ खातेदारांना २२४ कोटी ३० लाख ५२ हजारांचा लाभ देण्यात आला. अद्याप ही प्रक्रिया सुरूच आहे. त्याचप्रमाणे एकरकमी कर्जाचा भरणा करून २५ हजारांपर्यत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेणारे किमान १३ हजार खातेदारांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.बँकांचा पाच टक्क्यांपर्यंतचा एनपीए असला, तर बँकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे गृहीत धरण्यात येते. यंदा किमान एक हजार कोटीपर्यंत कर्जमाफीसह अनुदानाचा लाभ शेतकरी खातेदारांना मिळणार आहे. यामध्ये नियमित कर्जदार वगळता इतर थकबाकीदार खातेदारांचे कर्जदेखील माफ होत आहे, तर एकरकमी परतफेडीमध्ये बँँकांची थकबाकी बºयाच प्रमाणात निकाली निघाली. यामुळे बँकांचा वाढलेला एनपीएदेखील झपाट्याने सुधारत आहे. प्रामुख्याने जिल्हा बँकांच्या अर्थिक स्थितीत सुधार येत आहे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला असला तरी बँका मालामाल होत आहेत, हे निश्चित.जिल्ह्यातील बँकांची थकबाकीव्यापारी बँकांची ४५,३६४ खातेदारांकडे ५० हजारांपर्यंत ८७.०४ कोटी, १ लाखांपर्यंत ३९,६२९ खातेदारांकडे १८९.४८ कोटी, दीड लाखांपर्यंत १५,८७१ खातेदारांकडे ११३.१८ कोटी, दोन लाखांपर्यंत ८७४ खातेदारांकडे ६३.३२ कोटी, २ लाखांवर ९८२३ खातेदारांकडे २५१.८ कोटी अशी एकूण १,१३,६११ खातेदारोंकडे ७१८.२४ कोटींची थकबाकी आहे.ग्रामीण बँकांची २०२ खातेदारांकडे ५० हजारांपर्यंत ६३.१६ कोटी, १ लाखांपर्यंत ३४३ खातेदारांकडे २.५२ कोटी, दीड लाखांपर्यंत १७१ खातेदारांकडे १.९६ कोटी, दोन लाखांपर्यत ८७४ खातेदारांकडे २६.०५ कोटी, २ लाखांवर ९८२३ खातेदारांकडे २६.०५ लाख अशी एकूण १६३४ खातेदारांकडे ७.१५ कोटींची थकबाकी आहे.जिल्हा बँकेची २३,८५७ खातेदारांकडे ५० हजारांपर्यंत ९९.३२ कोटी, १ लाखांपर्यंत २५,१३२ खातेदारांकडे ११९.७४ कोटी, दीड लाखांपर्यंत ९,६०८ खातेदारांकडे ५६.९४ कोटी, दोन लाखांपर्यंत १,८४८ खातेदारांकडे १.०९ कोटी, २ लाखांवर ८६२ खातेदारांकडे ५.११ कोटी अशी एकूण ६१,३०७ खातेदारांकडे २८२.२१ कोटींची थकबाकी आहेजिल्हा बँकेचा ग्रॉस एनपीए ११२ कोटींवरजिल्हा बँकेच्या ३१ मार्चच्या ताळेबंदानुसार, यंदाचा ग्रॉस एनपीए ११२.३३ कोटींवर आहे. हा साधारणपणे २० टक्के या प्रमाणात आहे. पूर्वीच्या तुलनेत बँकेच्या एनपीएत सुधार होत असला तरी ही स्थिती इतर बँकांच्या तुलनेत निश्चितच चांगली नसल्याचे मानण्यात येते. यात कर्जमाफीने सुधार होणार आहे. २०१५ मध्ये जिल्हा बँकेचा ग्रॉस एनपीए २६० कोटींवर होता. ही टक्केवारी २९.४५ होती. तो २०१४ मध्ये २५४ कोटी २० लाखांवर होता. ही टक्केवारी २५.३८ होती.बँकांची १००७.६१ कोटींची थकबाकीजिल्ह्यातील बँकाची १ लाख ७६ हजार ५५२ शेतकऱ्यांकडे १००७ कोटी ६१ लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये १ लाख ३१ हजार ३४१ खातेदारांकडे ६६० कोटी ४५ लाखांचे पीक कर्ज थकीत आहे, तर ५० हजार १६५ खातेदारांकडे ३७४ कोटी ७७ लाखांचे मध्यम मुदती कर्ज थकीत आहे. सद्यस्थितीत ८५ हजार १४२ खातेदारांचे ४३७ कोटी ३१ लाख ५१ हजारांचे कर्ज बँकांना वर्ग करण्यात आले आहे.