शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे होरपळल्या केळीच्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:27 IST

काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देतापमान ४३ अंशावर : सिंचन व्यवस्था कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा वर चढत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्री बºयाच उशिरापर्यंत उष्ण वारे वाहतात. केळी पिकांसाठी हे प्रतिकूल वातावरण आहे. पिकास पाणी दिले तरी फाटलेल्या पानांमुळे उन्ह थेट जमिनीवर पडत आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. भिजविलेली जमीन तात्काळ कोरडी होत आहे. केळी पीक निसवण्याच्या अवस्थेत आहे. काही भागांत निसवण सुरू झाली आहे. परंतु, उन्हामुळे पाने होरपळून गेल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे.ओलितासाठी जमिनीखाली पाणीच नसल्याने तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांच्या बागा धोक्यात आल्या असून, जवळपास एक महिना तापमानाचा वरवंटा शेष असताना आजच संत्राबागा व्हेंटिलेटरवर आहेत. भरपूर पाण्याची गरज पुरी होणार नसल्याने बहुतांश बागा संपणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे .‘मे’ च्या उत्तरार्धात उन्हाचे चटके तीव्रयावर्षी बागांचे भविष्य धोक्यात असल्याचे चित्र समोर दिसत आहे. मेच्या उत्तरार्धात उन्हाचे चटके अधिक तीव्रपणे जाणवायला लागलेत. पाऊस यायला अद्यापही एक महिना शिल्लक आहे. आजच संत्राबागा पिवळ्या पडत आहेत. केळी हे पीक तर संवेदनशील आहे. या पिकाची उन्हाळ्यात काळजी घ्यावी लागते. यावर्षी पाणीच नाही आणि वरून सूर्य आग ओकत आहे. यामुळे केळीच्या बागा नष्ट होणार असल्याचा धोका व्यक्त होत आहे.१४ हजार हेक्टर क्षेत्रात ओलिततालुक्यात पेरणीयोग्य असलेल्या ४२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १४ हजार हेक्टरवर ओलित आहे. देवगाव, खोडगाव, दहिगाव, चिंचोना, पळसखेळ, सावरपाणी, हिरापूर, कारला, तुरखेड या भागात संत्री, केळी व पानपिंपरी या पिकांच्या बागा आहेत. तीन वर्षांपासून पाऊस अत्यल्प झाल्याने भूपातळी कोरडीच राहिली. एखाद्या भागात पाणी असल्याचे समजताच त्या शेतकऱ्याला पैसे देऊन व तेथे बोअरवेल करून आठ ते दहा किलोमीटरवरून पाणी आणले जात आहे. जमिनीच्या पोकळीत असलेले पाणी संपले की, हेही थांबेल.