शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री आणि वाहतुकीवर बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

By प्रदीप भाकरे | Updated: January 6, 2023 18:03 IST

नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. गळा कापणे, चेहरा विद्रुप होणे, नाक, कान, व गालावर गंभीर जखमा होणे तसेच दुचाकी वाहनचालक नायलॉन मांजास अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमरावती : संक्रांतीचा सण आठवडाभरावर आला असून, पतंगबाजी सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाच्या ऑनलाइन विक्री व वाहतुकीवर बंदी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कालावधीत नायलॉन मांजा ऑनलाइन पद्धतीने किंवा कुरिअरद्वारे खरेदी किंवा विक्री व पुरवठा करताना व जवळ बाळगताना आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी पोलिस आयुक्त डॉ. नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.

नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. गळा कापणे, चेहरा विद्रुप होणे, नाक, कान, व गालावर गंभीर जखमा होणे तसेच दुचाकी वाहनचालक नायलॉन मांजास अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नायलॉन मांजा नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका निर्माण करतो. त्याचप्रकारे नायलॉन मांजा रस्त्यावर, खांबावर तसाच अडकून राहतो. त्यामुळे पर्यावरणास धोका संभवतो. सबब, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरिता पोलिस आयुक्तांनी यंदाच्या मकर संक्रांतीच्या सणाच्या कालावधी दरम्यान शहरातील नागरिक व व्यावसायिकांना नायलॉन मांजा, प्रतिबंधित साहित्य, ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे पुरविण्यास तसेच नायलॉन मांजा कुरिअरद्वारे वाहतूक करण्यास मनाई आदेश जाहीर केले आहेत.

३१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश -नायलॉन मांजाबाबतचा हा मनाई आदेश ४ ते ३१ जानेवारीपर्यंत लागू राहील. १४ जानेवारी रोजी मकर संकांतीचा सण असून, या काळात शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून सण साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची खरेदी - विक्री केली जाते. नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनविला जातो. त्यामुळे नायलॉन मांजा सहसा तुटत नाही व काही वर्षे तसाच टिकून राहतो.

नायलॉन मांजाने घेतला होता दिव्याचा बळी -स्थानिक पुंडलिक बाबा नगरात राहणारी दिव्या शंकर गवई ही परिचारिका तरुणी दुचाकीने कामासाठी निघाली असता रस्त्यात आडव्या आलेल्या नायलॉन मांजाने तिचा गळा चिरला होता. वेळीच मदत न मिळाल्यामुळे तरुणीचा तडफडत मृत्यू झाल्याची सुन्न करणारी घटना २१ जून २०२१ रोजी सायंकाळी घडली होती. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी छापे टाकून नायलॉन मांजा जप्त केला होता.

महापालिकेचेही तपासणी पथक -महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत नायलॉन मांजाचा वापर व विक्री प्रतिबंधित करण्याकरीता जप्ती व दंडात्मक कारवाई करणेकरीता झोननिहाय पथक गठित करण्यात आले आहेत. सोबतच, महानगरपालिका, महसूल विभाग व पोलीस विभागाचे नॉयलॉन मांजा विक्री व वापर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसंदर्भात तपासणी पथक गठीत करण्यात आले आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस