शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

अनेक गंभीर गुन्ह्यांमागे बारूद गँग

By admin | Updated: August 19, 2015 00:42 IST

येथील बहुचर्चित अमित बटाऊवाले यांची हत्या होऊन आठ दिवसांचा अवधी लोटला असला तरी शहरवासीयांमध्ये अजूनही खदखद कायम आहे.

नागरिकांचा आग्रह : गुन्हेगारीचा नायनाट कराअमरावती/अचलपूर : येथील बहुचर्चित अमित बटाऊवाले यांची हत्या होऊन आठ दिवसांचा अवधी लोटला असला तरी शहरवासीयांमध्ये अजूनही खदखद कायम आहे. बारूद गँगच्या अनेक गुन्हेगारी कारवायांचे किस्से चव्हाट्यावर आले असून आणखी काही किस्से समोर येत आहेत. युवतींच्या छेडखानीमुळे दोन समुदायात हाणामारीच्या घटना अचलपुरात सातत्याने घडतात. कधी संघटनेच्या फलकावरून तर कधी किरकोळ कारणावरून अचलपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण होत असते. यात बारूद गँगची विशेषत्वाने भूमिका असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारूद गँगच्या सदस्यांनी निर्दयीपणे भरदिवसा लोकांसमक्ष अमित बटाउवाले यांची हत्या केली. त्यांचे वडील मोहन बटाऊवाले यांनाही गंभीर जखमी केल्यामुळे येथे प्रचंड जनक्षोभ उफाळला होता. बारुद गँगला प्रशासनाकडून अभय मिळाल्यानेच यांची इतकी हिंमत वाढली आहे. अमितच्या हत्येनंतरही प्रशासनाने हवी तशी भूमिका वठविली नव्हती. तथापि, बारुद गँगच्या गुन्हेगारीचा आलेख सहनशिलतेच्याही वर पोहचल्याने आता त्यांचा कायम बंदोबस्त व्हायलाच हवा, अशी लोकभावना अचलपुरात व्यक्त होऊ लागली आहे. अचलपूरची संवेदनशील शहर म्हणून पोलीस दफ्तरी नोंद आहे. २००७ साली नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करून शहरातील दुकाने जाळण्यात आली होती. विशेष म्हणजे बारूद गँगच्या सदस्यांनीच हा प्रकार घडवून आणला होता. सदर घटनेनंतर अचलपूर पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात येऊन सरमसपुरा नावाने दुसऱ्या पोलीस ठाण्याची निर्मिती तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली होती. अचलपूर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी दुसरे पोलीस स्टेशन अस्तित्वात आले असले तर भ्रष्ट प्रशासनामुळे त्यात विशेष फरक पडला नाही. बारुद गँगच्या कारवायांना मुळीच लगाम लागला नाही. ‘त्या’ माऊलीला मिळणार का न्याय ?माझ्या पतीवर हल्ला होऊ शकतो. मंडळ अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना पतीचा मोबाईल नंबर दिला, अशी तक्रार मृत अमितच्या आईने प्रशासनाकडे केली होती. इतकी स्पष्ट तक्रार केल्यानंतरही अमितला ठार मारले गेले. आता अमितच्या गुन्हेगारांना गजाआड पाठवून अचलपूर -परतवाड्यातील तमाम नागरिकांना दहशतीच्या सावटातून मुक्त करणे आज त्या माऊलीला खरा न्याय असेल. कुठलाही दोष नसताना पोटचा गोळा गमावणाऱ्या माऊलीला हा न्याय कधी मिळेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ‘लोकमत’च्या निडर भूमिकेचे स्वागतबारुद गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर पोलीस प्रशासन सक्रिय झाले. कुख्यात गुन्हेगारांपैकी आठ जणांना अटक झाली. या गँगचा नायनाट व्हावा, अचलपूर-परतवाड्यातील नागरिकांना निडरपणे जगता यावे, यासाठी जुळ्या नगरीतील लोकभावनेचा रोख बघून ‘लोकमत’ने गुन्हेगारी कारवायांवर आसूड ओढणे सुरूच ठेवल्यानंतर अनेक नागरिक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. ‘लोकमत’ला फोन करून, पत्र पाठवून जुळ्या नगरीतील नागरिक अभिनंदन तर करताहेतच पण बारुद गँगविरुद्ध उभे ठाकण्याची ‘लोकमत’ने घेतलेली भूमिका कायम राखण्याचाही आग्रह होत आहे.