राजुरा बाजार : वरूड-तळेगाव (शामजी पंत) राज्य महामार्ग क्रमांक २४५ या महामार्गावर डांबराचे ठिगळ लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, एका बाजूला टाकलेली गिट्टी संपूर्ण रस्त्यावर आल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. नाममात्र डांबर टाकून पॅचेस भरण्यासाठी जाडी डस्ट टाकण्यात येत आहे. गुरुवार बाजाराचा दिवस असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ होती. दरम्यान, अनेक दुचाकी वाहनचालक घसरून पडले. गुरुवार, ३ डिसेंबर रोजी एका दुचाकीचालकाचा पॅचेसवरून घसरून अपघात झाला. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत होऊन त्याला कायमचे अपंगत्व आले. पॅचेसवरील जाड डस्ट अपघाताला आमंत्रण देत आहे.
वरूड-तळेगाव मार्गावरील गिट्टी अपघातास कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST