सुसंस्कार पिढी घडविण्याचे आवाहन : कीर्तनातून मांडली स्त्रियांची व्यथा, सैराट प्रेमावरही आक्षेपगुरूकुंज मोझरी : वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सहभागी शेकडो कीर्तनकारांच्या मांदियाळीमध्ये बालकीर्तनकार परमेश्वरी रायजी प्रभू शेलोटकरने महिलांच्या ज्वलंत प्रश्नांवर कीर्तनाच्या माध्यमातून स्त्रीयांच्या प्रखर व्यथा या मंचावरून मांडून राष्ट्रसंतांचे व्यासपीठ जिंकले. यंदा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ४८व् या पुण्यतिथी महोत्सवाच्या व्यासपीठावरून सन १९६२ मधील भारत-पाकिस्तान युद्धप्रसंगात वं. राष्ट्रसंतांचे योगदान व त्यातून निर्माण केलेली देशभक्ती परमेश्वरीने कीर्तनातून मांडले. परिपूर्णपणे आधार घेत स्त्री जीवनाची व्यथा आजच्या समाजापुढे कीर्तनाच्या माध्यमातून मांडली. यावेही परमेश्वरी म्हणाली, आजच्या तरुण पिढीच्या मानगुटीवर सैराट प्रेमाचं भूत विराजमान आहे. त्यातून अनेकांना आपल्या बहिणी, लेकी, गमवाव्या लागल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने कुटुंबातून होणारे संस्कारच जबाबदार आहे. पालकांनो तुमच्या वर्तनातूनच तुम्ही तुमची संस्कारमय संतान घडवाल. आज बालवयात संस्कार करणे गरज होऊन बसले आहे. जिजाऊने शिवबा घडविला. शिवबाने इतिहास रचला. आजही अशाच संस्कारमय शिक्षण देण्याची गरज आई-वडीलांना आहे.आज स्फुर्ती गीतेश्रीगुरूदेव मानवसेवा छात्रालय प्रस्तुत ‘स्वरगुरूकुंजा’चे ग्रुपच्या वतीने सादर होणारे राष्ट्रसंतांची लोकधारा, लोकपारंपारिक गीते की जे लोप पावत चाललेल्या त्या गीतांना आजच्या आधुनिक युगात आधुनिक चालीवर बसवून या गीतांना उजाळा देणार आहे.े लोकसुधोरणेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित जाज्वल खंजेरी राष्ट्रीय समुह गीते सादर केली जातील.
बालकीर्तनकार ‘परमेश्वरी’ने जिंकले व्यासपीठ
By admin | Updated: October 20, 2016 00:20 IST