शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बालाघाटचा गतिमंद मुलगा खिरगव्हाणमध्ये गवसला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 20:56 IST

तातडीने सूत्रे फिरविण्यात आली अन् शनिवारी त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

वनोजाबाग (अंजनगाव सुर्जी) (अमरावती) : दीड महिन्यांआधी मध्यप्रदेशातील बालाघाट येथून बेपत्ता झालेला १५ वर्षीय मुलगा तालुक्यातील खिरगव्हाण येथे आढळून आला. गूगल या सर्च इंजिनवर शोध घेऊन रहिमापूर पोलिसांनी बालाघाट पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तातडीने सूत्रे फिरविण्यात आली अन् शनिवारी त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. रहिमापूर पोलीस ठाण्यात आपल्या मुलाला सुखरूप पाहून त्याच्या पालकांना आनंदाचे भरते आले. रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिरगव्हाण येथील पोलीस पाटील राजू घोगरे यांना ७ आॅगस्ट रोजी एक मुलगा पाण्यात भिजताना दिसून आला. त्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काहीही बोलत नसल्याने घोगरे यांनी याबाबत रहिमापूरचे ठाणेदार शेख जमील यांना कळविले. त्यादरम्यान तो मुलगा गतिमंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ठाणेदारांनी घटनास्थळ गाठून त्याला विचारणा केली. महत्प्रयासानंतर त्याने स्वत:ची ओळख ‘दिनेश लक्ष्मण उईके, गाव कावेली, तहसील परसोडा, जिल्हा बालाघाट’ अशी माहिती दिली. त्या माहितीवरून रहिमापूर पोलिसांनी गूगलवरून कावेली गावासह नजीकच्या पोलीस ठाण्याचा शोध घेतला. त्याचे गाव बालाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे संपर्क साधण्यात आला. त्या पोलिसांनी दिनेशच्या पालकांशी संपर्क करून त्यांचा मुलगा अमरावती जिल्ह्यातील रहिमापूर पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले. त्या माहितीवरून त्याचे पालक शनिवारी रहिमापुरात पोहोचले. तो दीड महिन्यांपासून घरून बेपत्ता झाला होता, अशी माहिती समोर आली. त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती