सर्वांचे लागले होते लक्ष : अचलपूर न्यायालयाचा निर्णय परतवाडा : अचलपूर येथील बहुचर्चित अमित बटाऊवाले हत्याप्रकरणातील तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. हेडावू यांच्या न्यायालयाने फेटाळल्याने आरोपींना शुक्रवारी जामीन मिळू शकला नाही. अचलपूर येथे वाळू तस्करांनी अमित बटाऊवाले यांची निर्घृणपणे हत्या करुन त्यांचे वडील मोहन बटाऊवाले यांना गंभीर जखमी केले होते. १० आॅगस्ट २०१५ रोजी घडलेल्या या हत्याकांडातील १५ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. चार तास युक्तिवादपरतवाडा : अर्शद खान, मो. आदिल मो. अनवर व लकी अली सादिक अली यांच्या जामिनीसाठी १० फेब्रुवारी रोजी सरकारी व आरोपींच्या वकिलांचा तब्बल चार तास युक्तिवाद चालला. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी त्यावर निर्णय देण्याचे न्यायालयाने सांगितले होते. तिघांचा जामीन फेटाळला अमित बटाऊवाले हत्या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता उमेशचंद्र यादव पाटील यांनी न्यायालयात संबंधित तिन्ही आरोपींचे मोबाईल कॉल गुन्हात सहभागी असल्याचे पुरावे, गुन्हात वापरण्यात आलेले हत्यार, वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्षदर्शी पुरावे व सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश सादर केले होते.आरोपींच्यावतीने रवींद्र खोजरे, परवेश मिर्झा व शौकत अली या विधिज्ञांंनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.अपेक्षित असा निर्णय आला. आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग व प्रत्यक्ष न्यायालयात सादर केलेले दस्तावेज पाहता योग्य निर्णय आला. - उमेशचंद्र यादव पाटील, विशेष सरकारी अभियोक्ता, मुंबई.
तीनही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले
By admin | Updated: February 13, 2016 00:03 IST