शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे १०० कोटी केव्हा ?, संस्थाचालकांचे समाजकल्याणकडे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 17:34 IST

अमरावती : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याची बाब त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा ठरू लागली आहे.

गणेश वासनिकअमरावती : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याची बाब त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा ठरू लागली आहे. अमरावती विभागातून सुमारे १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम शासनाकडून घेणे आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी शिष्यवृत्तीच्या रकमेसाठी समाजकल्याण विभागाकडे तगादा लावल्याचे वास्तव आहे.ओबीसी, अनुसूचित जाती, व्हीजे-एनटी, एसबीसी या संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळते. मात्र, ११ जानेवारी २०१० रोजी राज्यातील शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी राज्यभरातील शैक्षणिक संस्थांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हजारो कोटींच्या घोटाळ्याची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी एसआयटी गठित केली. एसआयटीने चौकशीनंतर राज्य शासनाला अहवालदेखील सादर केला. परंतु, अद्यापही संस्थाचालकांवर ठोस कारवाई नाही.विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज अनिवार्य केले. राज्य शासनाने ई-शिष्यवृत्तीच्या इत्थंभूत कामांसाठी पुणे येथील मास्कटेक कंपनीसोबत ३० एप्रिल २०१६ रोजी करार केला. मात्र, सॉफ्टवेअरमध्ये असंख्य त्रुटी असल्याने सन २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. पुन्हा नव्याने सन २०१७-२०१८ या वर्षासाठी ई-शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, यासाठी महाडीबीटी अंतर्गत नागपूर येथील इन्व्होलेव मेसर्स कंपनीला कंत्राट  सोपविले गेले. इन्व्होलेव मेसर्सने ई-शिष्यवृत्तीचे काम सुरू केले; पण जुन्या-नवीन वेबसाइटचे तंत्र काही जुळत नाही. शिष्यवृत्तीबाबत जुन्या वेबसाइटमध्ये विद्यार्थ्यांच्या इत्थंभूत नोंदी, माहिती उपलब्ध आहे. परंतु, नव्या वेबसाइटमध्ये तसे काहीच नाही. त्यामुळे राज्य शासनाने कशाच्या आधारे इन्व्होलेव मेसर्सला मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ई-शिष्यवृत्तीचे काम सोपविले, हा संशोधनाचा विषय आहे. ई-शिष्यवृत्ती प्रक्रिया तांत्रिक कारण आणि शासनकर्त्यांच्या दुर्लक्षाने ठप्प पडल्याने याचा फटका मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसत आहे. गतवर्षीच्या शिष्यवृत्ती रकमेबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. अशातच चालू शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीचेही भिजतघोंगडे कायम आहे.

घोटाळ्याचा फटका विद्यार्थ्यांना का ?शिष्यवृत्ती घोटाळा संस्थाचालकांनी केला आहे. मात्र, याचा फटका मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. घोटाळेबाज महाविद्यालयात शिष्यवृत्ती देणे बंद असल्याने तेथे शिक्षण घेणाºया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पायपीट करावी लागत आहे.  हा एक प्रकारे अन्यायच असल्याची भावना विद्यार्थ्यांच्या आहे.

पुन्हा शिष्यवृत्तीसाठी आॅफलाइन ई-शिष्यवृत्ती महाडीबीटीच्या तांत्रिक कात्रीत अडकली आहे. त्यामुळे पुन्हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी आॅफलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय २० नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने घेतला. शिष्यवृत्तीची जुनी रक्कम कायम असताना नव्या शिष्यवृत्तीबाबत तदर्थ रक्कम देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे  राज्य शासनाला नेमके शिष्यवृत्तीबाबत काय करायचे आहे, हेच कळत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती