शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

परत वाड्यात लोकमत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST

६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान अनिल कडू परतवाडा : लोकमत रक्तदान शिबिराला परतवाड्यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ६५ रक्तदात्यांनी ...

६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

अनिल कडू

परतवाडा : लोकमत रक्तदान शिबिराला परतवाड्यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदाना करिता आलेल्या ३७ रक्तदात्यांना वैद्यकीय कारणावरून रक्त देता आले नाही. वेळेअभावी ३४ दाते रक्तदान करू शकले नाहीत. या रक्तदान शिबिराला रक्त दात्या महिलांची व युवतींची उपस्थिती लक्षवेधक राहली.

या लोकमत रक्तदान शिबिरात अनेकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त, तर काहींनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले. पती-पत्नी असे उभयतांनी एकाच वेळेस एकत्रित रक्तदान केले. सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण, राजकीय आणि वन व वन्यजीव प्रेमींनीसह सर्वच क्षेत्रातील मंडळींनी या शिबिरात रक्तदान केले. आपला सहभाग नोंदविला.

''लोकमत रक्ताचं नातं '' या मोहिमेनिमित्ताने रक्तदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल. रक्तदान हि नात्यांची चळवळ. नातं जपण्याची चळवळ लोकमतने जोपासली आहे. रक्तदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. लोकमतच्या या उपक्रमामुळे रक्तदात्यांना जीवरक्षक बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. लोकमतच्या या रक्तदान मोहिमेतून संकलित केल्या जाणाऱ्या रक्त पिशवीतून अनेकांचे जीव वाचतील, असे प्रतिपादन प्राचार्य काशिनाथ बऱ्हाटे यांनी केले.

बुधवार ७ जुलैला, गुरुकुल पब्लिक स्कूल, अचलपूर रोड, परतवाडा येथे पार पडलेल्या लोकमत रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर काशिनाथ बऱ्हाटे यांच्या हस्ते पार पडले. रक्ताला पर्याय नाही. रक्त प्रयोगशाळेत तयार होत नाही. रक्ताकरिता रक्तच लागतं. मला यात रक्तदान करता आले हे माझे भाग्यच, असे प्रतिपादन अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी केले. रक्तदाता हा समाजाचा खरा हिरो आहे. या शिबिरात मला रक्तदान करता आले याचा आनंद आहे, असे प्रतिपादन अचलपूर ते तहसीलदार मदन जाधव यांनी केले. गुरुकुल पब्लिक स्कूलचे अध्यक्ष रवींद्र गोळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितीन मानकर, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, लोकमतचे सहायक वितरण व्यवस्थापक रवींद्र खांडे, लोकमतचे सेल्स प्रतिनिधी (जाहिरात) सचिन जानोळे, अभय माथने, रुपेश लहाने, नगरसेविका अक्षरा लहाने, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिनेश कळसकर, रक्तदान चळवळीला समर्पित व्यक्तिमत्व विनय चतुर, अचलपूर नगरपालिकेचे आरोग्य सभापती संदीप उर्फ बंटी ककरानिया, सर्पमित्र जयंत तायडे, वनपाल तथा प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अभय चंदेल, मिलिंद गायधने, पत्रकार आशिष गवई, लोकम एजंट कैलास रावत, कमलेश ठाकूर, नदीमभाई यांचेसह ९० मान्यवर व रक्तदाते यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर व्यास, आभार प्रदर्शन गुरुकुल पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुधीर इंगळे यांनी केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. ए. एस. उकंडे, आशिष पाटील, अश्विनी गायगोले, प्रवीण कळसकर, सुदेश वानखडे, संगीता गायधने यांनी रक्त संकलन केले. या रक्तदान शिबिरात लोकमत समाचारचे प्रतिनिधी सागर व्यास व लोकमतचे अचलपूर शहर प्रतिनिधी संतोष ठाकूर यांचे प्रयत्न उल्लेखनीय राहिले.

-- भावपूर्ण सत्कार----

याप्रसंगी अचलपूर मध्ये रक्तदान चळवळ मजबूत करीत शेकडो रक्तदात्यांची फळी उभारणाऱ्या आणि आरोग्यसेवेस समर्पित व्यक्तिमत्व विनय चतुर, ९० वेळा रक्तदान केलेले नगरसेवक गोवर्धन मेहरे, ७५ वेळा रक्तदान केलेले गजानन चापके,२५वेळा रक्तदान केलेल्या महिला रक्तदात्या मंगला पांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते लोकमतच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रक्तदात्यांना कार्ड व शासकीय प्रमाणपत्र देण्यात आले.

--- यांनी केले रक्तदान---

ओमप्रकाश अग्रवाल, दिनेश उघडे, प्रकाश सोनार, अक्षय सोनपराते, हेमंत घुरडे, प्रेमा घुरडे, ऋषिकेश कडू, श्रीकांत उमक, मंगेश लोखंडे, शुभम नागे, भोला बेठे, मयूर गावंडे, मोहित गोळे, अनूप रहाटे, गोपाल सीसांगीया, पूजा सीसांगीया, रुपाली माथने, प्रिया माथने, राजेंद्र नागले, ऋषिकेश अब्रुक, आनंद मेहरे, ओंकारसिंग चंदेल, संदीपकुमार अपार, श्वेता लाड, प्रितेश लाड, मदन जाधव, सुधीर इंगळे, विनोद ठाकूर, मनोहर खडके, अमोल राऊत, श्यामल पानडे, दिनेश कळसकर, रियाज शाहा, तौसिम गाठे, प्रताप गावंडे, जयंत तायडे, तिलक यादव, संतोष काळे, राहुल राजस, संदीप ककरानिया, लवकेश टेटवार, मोहम्मद रिजवान, श्रेयस कडू, मुकेश दुरगकर, गजेंद्र ठाकूर, वैभव गौर, अमोल काळबांडे, नीलेश फाटकर, रोहित लकडे, ऋषभ धाकतोडे, कमलेश ठाकूर, उद्देश चिटूकणे, महेश जगताप, सतीश मडावी, अर्जुन घुगे, सागर महल्ले, विवेक लष्करी, निखिल जयसिंगपुरे, अजय भागोले, नवीन प्रजापति, सुजित गोळे, विवेक महल्ले, संतोष ठाकूर, सुनील व्यास, भूषण गनगणे, यांनी रक्तदान केले. त्यांचे गुलाब पुष्पाने लोकमतच्यावतीने स्वागत करण्यात आले.

दि8/7/21/ फोटो