लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आमदार बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन सोमवारी मागे घेतले. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यासाठी यशस्वी शिष्टाई केली.एकूण मागण्यांपैकी जिल्हास्तरीय समस्या मार्गी लावल्याचे तसेच राज्यपातळीवरील समस्यांसंबंधाने मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्या सोडविल्या जातील, असे पत्र पालकमंत्र्यांनी कडू यांना दिले. त्यानंतर अन्नत्याग आंदोलन मागे घेतले गेले.रविवारी उशिरा रात्री कडू यांना आंदोलन स्थळाहून इर्विनमध्ये हलविण्यात आले होते. पालकमंत्र्यांनी कडू यांची तेथे भेट घेऊन विचारपूस केली.आ.कडूंच्या आंदोलनाबाबत शनिवारी पत्र मिळाले. त्यानुसार विविध यंत्रणांची रविवारी बैठक घेऊन स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्यात. राज्यस्तरीय समस्यांबाबत मुख्यमंत्री बैठक घेऊन त्या सोडवतील, असा निर्णय झाला. - प्रवीण पोटे, पालकमंत्री
बच्चू कडूंचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 21:58 IST
आमदार बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन सोमवारी मागे घेतले. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यासाठी यशस्वी शिष्टाई केली.
बच्चू कडूंचे आंदोलन मागे
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची शिष्टाई : मुख्यमंत्र्यांशी चर्चेची हमी