शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

KBC 11 : करोडपती बबिता म्हणतात, ‘मुलांना खिचडी भरवतच राहणार!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 06:01 IST

Kaun Banega Crorepati 11 : ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात हॉट सीटवर बसून एक कोटी रुपये जिंकणाऱ्या अंजनगावच्या बबिता ताडे यांच्या कर्तृत्वामुळे अमरावती जिल्ह्याची मान देशभरात अभिमानाने उंचावली आहे.

- सुदेश मोरे सुर्जी (अमरावती) : महानायक अमिताभ बच्चन यांच्यापुढे ४८०० जणांमधून ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात हॉट सीटवर बसून एक कोटी रुपये जिंकणाऱ्या अंजनगावच्या बबिता ताडे यांच्या कर्तृत्वामुळे अमरावती जिल्ह्याची मान देशभरात अभिमानाने उंचावली आहे. बबिता ताडे यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले. स्पर्धा परीक्षा देण्याची विद्यार्थीदशेतील इच्छा आणि आतापर्यंत सुरू असलेले सातत्यपूर्ण वाचन यामुळे त्यांचे सामान्य ज्ञान समृद्ध होत गेले. केबीसीचा मंच त्यांनी याच ज्ञानाच्या जोरावर जिंकला. बबिता यांचे पती सुभाष ताडे हे हरणे विद्यालयातच शिपाई या पदावर कार्यरत आहेत. मुलगी पुणे येथे उच्चशिक्षण घेत आहे तर मुलगा अंजनगावात शिक्षण घेतो आहे.४०० मुलांची खिचडी शिजविण्याच्या मोबदल्यात अवघे १५०० रुपये मिळतात. असे असले तरी चिमुकल्यांना भरविण्यात मिळणारा आनंद अद्वितीय आहे आणि इथून पुढेही मी खिचडी शिजविण्याचे काम सुरूच ठेवणार, अशी भावना बबिता यांनी बोलून दाखविली.पतीला बाइक घेऊन देणार!‘‘केबीसीत एक कोटी रुपये जिंकण्याचे श्रेय पतीला देईन, असे बबिता म्हणाल्या. त्यांनी मला शिक्षण, अभ्यासापासून थांबविले नाही. आम्ही परस्परांच्या कामांचा आदर करतो. आता मिळालेल्या एक कोटी रुपयांमधून अंजनगावातील एका छोट्या शिवमंदिराची पुनर्बांधणी करायची आहे. मुलांचे उच्चशिक्षण आणि पतीला नवी बाइक घेऊन द्यायची आहे. आणि हो, खिचडी शिजविण्याचे काम सुरूच ठेवायचे आहे,’’ असे बबिता यांनी सांगितले.

टॅग्स :Kaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपतीAmitabh Bachchanअमिताभ बच्चन