अमरावती : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाणदिनी रविवारी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत येथील इर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार्रापण करण्यासाठी गर्दी जमली होती. इर्विन चौकात आंबेडकरी अनुयायी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून डॉ.बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी एकत्रित आले होते. यात महिला, पुरुष, युवक, युवती आणि आबालवृद्धांचाही समावेश होता. ज्या महामानवाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला, त्या महामानवाला नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची रांग लागली होती.हार, फुले अर्पण करण्याऐवजी वही, पेन दान कराभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्यांना बाबासाहेबांना अपेक्षित असलेला शिक्षित समाज निर्माण करण्यासाठी हार, फुले, मेणबत्ती अर्पण करण्याऐवजी वही, पेन दान करण्याचे आवाहन समता सैनिक दलाचे सुदाम सोनुले, विजय डोंगरे यांनी केले होते. या आवाहनाला काही आंबेडकरी अनुयायांनी प्रतिसाद दिला. हार, फुलांऐवजी गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वही, पेन सोबत आणल्याचे दिसून आले.
बा भीमा तू गेलास आम्हा सोडूनी...
By admin | Updated: December 7, 2015 04:42 IST