शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आझाद समाज पार्टीचे पाचव्या दिवशीही बेमुदत धरणे सुरूच

By उज्वल भालेकर | Updated: October 1, 2023 20:24 IST

आमदार बळवंत वानखडे यांची आंदोलनाला भेट; सरकारचा केला निषेध

उज्वल भालेकर, अमरावती : राज्य शासनाच्या सरकारी शाळेचे खासगीकरण व नोकरभरती कंत्राटी पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात मागील पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आझाद समाज पार्टीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला रविवारी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनीही सरकारच्या खासगीकरणाचा निषेध करत आंदोलनाला पाठिंबा दिला.

येथील कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरण्याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाल्याचे आझाद समाज पार्टीचे म्हणणे आहे. शासकीय सेवेतील आरक्षण संपविण्याचा हा सरकारचा डाव असून, कंत्राटी पद्धतीने नोकरभरतीचा हा निर्णय बहुजन समाजातील विद्यार्थ्यांविरोधातील आहे. एकीकडे परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी होत असताना राज्य सरकारच्या तिजोरीत भरती प्रक्रियेतून २६३ कोटी रुपये जमा झाले आहेत. सामान्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याचे आझाद समाज पार्टीचे म्हणणे आहे.

यावेळी बेमुदत संपामध्ये डॉ. महेश बलान्से, अनिल फुलझेले, रवी हजारे, नंदू काळमेघ, जितेंद्र रामटेके, सुरेश ठाकरे, संजय गडलिंग, वंदना बोरकर, अशोक इंगोले, वीणा स्वर्गे, लक्षण चाफळकर, ज्योती बोरकर, दिनेश यादव, मनीष साठे, किरण गुडधे, मोहम्मद जाकीर, शेख अलिम, रोहित भटकर, सागर ढोके, डॉ. शिवलाल पवार, विजय सवई, जंजिरसिंग टांग, ज्ञानेश्वर गडलिंग, वर्षा हिरोडे, प्रा. दीपक गवई, सोनल गादर, सुनील खडसे, नारायण चव्हाण, शिवा चव्हाण, समाधान वानखडे, भूषण बनसोड आदी विविध संघटनेचे कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी, महिला यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Politicsराजकारण