शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत दुजाभाव पशुपालकांद्वारा पुरस्कार परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:38 IST

झेडपीच्या पशुसंवर्धन विभागाद्वारा पशुपालकांशी दुजाभाव करण्यात येतो. ठिकठिकाणच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुंना वैद्यकीय सेवाही वेळेत मिळत नसल्याने पशू दगावत आहेत.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांकडे तक्रार : पशुसंवर्धन विभागाद्वारा हेळसांडचा आरोप

आॅनलाईन लोकमतअमरावती : झेडपीच्या पशुसंवर्धन विभागाद्वारा पशुपालकांशी दुजाभाव करण्यात येतो. ठिकठिकाणच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुंना वैद्यकीय सेवाही वेळेत मिळत नसल्याने पशू दगावत आहेत. याच्या निषेधार्थ चांदूरबाजार तालुक्यातील पशुपालकांनी त्यांना आजवर मिळालेले पुरस्कार मंगळवारी विभागीय आयुक्तांना परत केल्याने एकच खळबळ उडाली.चांदूरबाजार तालुक्यात स्वदेशी गोवंशाची डेअरी चालविणाऱ्या पंकज मिश्रा, कांताप्रसाद मिश्रा, सोनिया मिश्रा, इमरान खान, जीवन देशमुख, योगेश देशमुख, मनीष गणेशपुरे, नरेंद्र निर्मळ या पशुपालकांनी कैफियत सीईओ के.एम. अहमद व विभागीय आयुक्त पीयूषसींग यांचे केली व त्यांना आजवर पशुपालक म्हणून मिळालेले सर्व पुरस्कार परत केले.‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा?अनेक गावातील पशुवैद्यकीय रुग्णालय बंद राहतात. त्यामुळे पशुंना वेळेवर उपचार मिळत नाहीत. उपचाराअभाावी अनेक पशुंचा दुर्देवाने मृत्यू झाला आहे. पशुवैद्यकीय अधिकारीदेखील मुख्यालयी राहत नाहीत. ते केवळ कागदोपत्री रुग्णालयात राहत असल्याचा आरोप यावेळी पशुपालकांनी केला. यासर्व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.पशुुप्रदर्शनीतही पशुपालकांशी भेदभावजिल्ह्यात अनेक ठिकाणी पशुप्रदर्शनी आयोजित केली जाते. याठिकाणी एकदा सहभागी पशुपालकांना पुन्हा पात्र असतानाही बक्षीस नाकारला जात असल्याची खंत पशुपालकांनी व्यक्त केली. वास्तविकता हा जिल्हा परिषदेचा हा निर्णय शासन धोरणाच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.पशुप्रदर्शनीत पुरस्काराची पुनरावत्ती होऊ नये व स्थानिकांनाही प्राधान्य मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्र्धन समितीचा समितीचा ठराव आहे. तसेच यासंदर्भात बहुसदस्यीय निवड समिती आहे. त्यानुसारच धोरणात्मक निर्णय घेतले जातात.- डॉ. विजय राहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद