शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात कुस्ती स्पर्धेत १० लाखांच्या बक्षिसांची लयलूट

By admin | Updated: January 12, 2016 00:14 IST

युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने युवादिनाचे औचित्य साधून १२ व १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.

पत्रपरिषद : दोन दिवस राष्ट्रीय स्तरावरील मल्लांची मांदियाळीअमरावती : युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने युवादिनाचे औचित्य साधून १२ व १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी मल्लांना प्रोत्साहनपर बक्षीसांसह १० लाखांच्या बक्षिसांची लयलूट करता येईल, अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक आ. रवी राणा यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.राज्य कुस्तीगीर परिषद पुणे, अमरावती शहर तालीम संघटना यांच्या देखरेखीत बडनेरा जुनिवस्ती स्थित सावता मैदानावर उद्या मंगळवारी १२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता कुस्ती स्पर्धेचे उद्घघाटन केले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा या पहिल्यांदाच बडनेरा शहरात होत असून स्पर्धेकरीता लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या असल्याचे आ. राणा म्हणाले. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, मल्ल नासीर खान, विक्रम जाधव हे देखील येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. देश, राज्य स्तरावरील सुमारे ५०० मल्ल या स्पर्धेत येतील. ३०० मल्लांसोबत थेट संवाद करण्यात आल्याचे विदर्भ केसरी संजय तिरथकर यांनी सांगितले. नोकरीचा निर्णय मल्लांसाठी सुखदअमरावती : कुस्ती हा खेळ महाराष्ट्राच्या मातीतला असून या खेळाला राजाश्रय मिळण्याची गरज आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरी मल्लांना आता पोलीस खात्यात नोकरी दिली जाईल, अशी घोषणा करुन मल्लासाठी हा निर्णय सुखद असल्याचे संजय तिथतकर यांनी सांगितले. बडनेऱ्यात राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे म्हणजे नवोदित कुस्ती खेळाडुंना संधी देणे होय, असे आ. राणा म्हणाले. प्रमुख लढतीतील मल्लांना रोख एक लाख रुपये व चांदीची गदा भेट दिली जाणार असून युवा स्वाभिमान केसरी गदा असे या बक्षीसाला नाव ेदेण्यात आले आहे. लाल मातीत होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मल्लांच्या कर्तबगारी आणि खेळ बघण्याची संधी दर्शकांना मिळणार आहे. ज्येष्ठ कुस्रीगिरांचा सन्मान केला जाणार आहे. यासाठी जिल्हाभरातून कुस्तीगिरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी विदर्भातील खेळाडुला महाराष्ट्र केसरी हा बहुमान पटकाविता आला नाही. त्यामुळे कुस्तीला राजाश्रय मिळाला. गाव, शहरात मोठ्या प्रमाणात कुस्तीगिर तयार होतील, पत्रपरिषदेला आ. रवीे राणा, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विदभर के सरी संजय तिरथकर, आदींची उपस्थिती होती.