शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अहवालाची प्रतीक्षा, कॉल डिटेल्सवरून बयाण नोंदविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : कांडली येथील दुहेरी हत्या प्रकरणात पोलिसांनी परिसरातील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कांडली येथील दुहेरी हत्या प्रकरणात पोलिसांनी परिसरातील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत तर मोबाईल कॉल डिटेल्सवरून संबंधितांचे बयाणदेखील नोंदविले. मात्र, अजूनपर्यंत कुठलाच सुगावा लागलेला नसून हत्या की, आत्महत्या, यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. अंजनगाव मार्गावरील येणी पांढरी येथील शेतशिवारात असलेल्या राकेश अग्रवाल यांच्या शेतातील  शेत साहित्य ठेवण्याच्या शेडमध्ये बुधवारी सुधीर रामदास बोबडे ( ५२, रा. वनश्री कॉलनी कांडली) व ४८ वर्षीय महिलेचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आले होते. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी महिलेच्या हातात चायना चाकू होता. पर्स मोबाईल व इतर साहित्य सुस्थितीत पडून होते. पोलिसांनी प्रथमदर्शी सुधीरने महिलेची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शी कयास लावला होता; परंतु महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक चमूला घटनास्थळी पाठवून पुरावे गोळा करायला सांगितले. शवविच्छेदन अहवालात कुठलीच हयगय होऊ नये, परिस्थितीजन्य पुरावे सर्व बाबींवर गांभीर्याने तपासणीचे आदेश स्वतः घटनास्थळी भेट देऊन दिले होते. अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गौहर हसन यांच्या नेतृत्वात तपास सुरू असून, परतवाडाचे ठाणेदार संतोष ताले व इतर अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

कांडली अन् चिखलदरा स्टॉप सीसीटीव्हीत कैद पोलिसांनी विविध प्रकारे तपासाची दिशा ठरवित शहरातील प्रमुख मार्गांचे सर्व सीसीटीव्ही फुटेज गुरुवार-शुक्रवार दोन्ही दिवस तपासले. त्यामध्ये मृत महिला ज्या कापड दुकानात काम करत होती, तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती पायी चिखलदरा स्टॉपपर्यंत जाताना कैद झाली, तर सुधीर बोबडे हा सांगली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला. 

अहवालाची प्रतीक्षा दोन्ही मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालासोबतच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून गोळा केलेल्या बारीक नमुन्यांचा प्रयोगशाळेतील अहवाल त्यातून हत्या की, आत्महत्या, याचा खुलासा होणार आहे. घटनेपूर्वी गुंगीचे किंवा नशेचे औषध प्राशन केले का, या सर्व बाबींसाठी आता दोन्ही अहवालाची प्रतीक्षा पोलिसांनाही आहे. 

मोबाईल सीडीआरवरून बयाण सुधीर बोबडे व मृत महिलेच्या मोबाइलचे लोकेशन आणि सर्वाधिक प्रमाणात मृत्यूपूर्वी काही दिवसांमध्ये  संवाद साधला, त्या सर्वांचे बयान पोलिसांनी नोंदविले. त्यामध्येसुद्धा कुठेच काही आढळून आले नसल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी