३५०० विद्यार्थी सहभागी : 'लोकमत संस्काराचे मोती'ची विजेतीअमरावती : स्थानिक सेंट फ्रान्सिस इंग्लिश स्कूलची इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी अवंती कांडलकर हिने हवाई सफरचा आनंद लुटला. ती लोकमत संस्काराचे मोती २०१५ अंतर्गत प्रथम विजेती ठरली. या स्पर्धेत ३५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. आकाशात उडणारे विमान बघताना जो आनंद मिळतो त्यापैक्षा कितीतरी अधिक आनंद विमानात प्रवास करताना मिळतो, अशी प्रतिक्रिया तिने दिली. हवाई सफरला जाण्यापूर्वी शाळेच्या संस्थापक राजकमल चौव्हान, ट्रस्टी हिना छाबडा, विवेक छाबडा, संचालिका मीना बिसेन, कमलेश बिसेन, प्रधान अध्यापक सुषमा देशमुख आदींनी तिचा सत्कार केला. अभ्यासात अग्रेसर असलेली अवंती सातत्याने संस्काराचे मोती स्पर्धेत भाग घेत होती. मोठे बक्षीस मिळू शकले नसले तरी अभ्यासात याचा फायदा होत असल्याचे तिने याप्रसंगी सांगितले.अवंतीला ना. राजनाथ सिंग, ना.सुरेश प्रभूंचा पाहुणचार केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून महान भारत बनवा असा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना चॉकलेट व फराळाचा पाहूणचार दिला. तसेच रेल्वेमंंत्री सुरेश प्रभू यांनी सर्व विद्यार्थ्यांची संवाद साधला. व एक तास विद्यार्थ्यासमवेत घालविला.
सेंट फ्रान्सिसच्या अवंतीने घेतला 'हवाई सफर'चा आनंद
By admin | Updated: June 26, 2016 00:03 IST