शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

बंदीस्त नक्षल्यांच्या हालचालींवर लक्ष

By admin | Updated: April 26, 2017 00:12 IST

छत्तीसगड, महाराष्ट्रात नक्षलवाद्यांनी घातपाती कारावाया करून प्रशासनाविरुद्ध उठाव चालविला आहे.

तटाला पोलिसांचा पहारा : अंडा बराकीत दोघे जेरबंदअमरावती : छत्तीसगड, महाराष्ट्रात नक्षलवाद्यांनी घातपाती कारावाया करून प्रशासनाविरुद्ध उठाव चालविला आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या विविध कारागृहात जेरबंद असलेल्या नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवण्याचा सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमिवर अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त असलेल्या दोन नक्षलवाद्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तटाला पोलिसांचा पहारा असून कमाण्डोंची रात्र गस्त सुरू झाली आहे. गत काही दिवसांपूर्वी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव दोन नक्षलवाद्यांना अमरावती मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. या दोन्ही नक्षलवाद्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अतिसुरक्षेच्या कारणांमुळे कारागृह प्रशासनाने या दोन्ही नक्षलवाद्यांना अंडा बराकीत जेरबंद केले आहे. त्यांच्या इत्थंभूत हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जात आहे. कारागृह अधीक्षकांच्या दालनात थेट सीसीटीव्ही कॅमेरेची स्क्रिन असल्याने नक्षल चळवळीशी संबंधित असलेल्या या दोन्ही नक्षलवाद्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नक्षल चळवळीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय असलेला साईबाबा नागपूर कारागृहात बंदीस्त आहे. गुप्तचर विभागाचे निर्देशअमरावती : नागपुरात साईबाबासोबत एम. मित्रा व प्रशांत राही हे सुद्धा जेरबंद आहेत. कारागृहाच्या आत राहून हे नक्षलवादी बाहेर घातपाती कारवाया करू शकतात, अशी माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. बंदीस्त नक्षलवाद्यांच्या सुटकेसाठी अप्रिय घटना घडवून आणणे, शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी वेठीस धरणे आदी कारस्थाने नक्षलवादी करू शकतात. गुप्तचर विभागाने राज्य शासनाला दिलेल्या माहितीनुसार ज्या कारागृहांमध्ये नक्षलवादी बंदीस्त आहेत, त्या कारागृहांत आतील व बाह्य सुरक्षेत वाढीबाबत अवगत केले. कारागृहांतून नक्षली कारवायांना बळ मिळू नये, यासाठी सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. नागपूर कारागृहातून अन्य ठिकाणी नक्षलवादी हलविले आहे. त्यापैकी दोघे येथील कारागृहात बंदीस्त आहेत. सुरक्षा रक्षकांचे जागते रहोकारागृहाच्या मागील बाजुस तटालगत सुरक्षेसाठी दोन टॉवर आहे. या दोन्ही टॉवरवर बंदूकधारी सुरक्षा रक्षक २४ तास तैणात करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरही ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर दुर्बिणीने लक्ष ठेवले जात आहे. नक्षलवादी जेरबंद असल्याच्या पार्श्वभूमिवर कारागृह प्रशासनाने अंतर्गत व बाह्यसुरक्षेत वाढ केल्याचे चित्र आहे.नागपूर येथून आलेले दोन्ही नक्षलवादी हे अंडा बराकीत बंदीस्त आहेत. त्यांच्या एकूणच हालचालींवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्यांच्यावर नजर राहील. तटाच्या बाहेरील सुरक्षेसाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे.- रमेश कांबळे,अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह