अमरावती : या गाडीचे वेळापत्रक आणि रेल्वे स्थानकावरील थांबा इंत्थभूत माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. १ जुलैपासून अमरावती ते पुणे नवीन गाडी सुरु होणार, असे खा. अडसूळ यांच्या कार्यालयातून अधिकृतपणे कळविण्यात आले. परंतु खा. रक्षा खडसे यांनी गुरुवारी रेल्वेमंत्री प्रभू यांची भेट घेवून पुणे ते भुसावळ ही गाडी अमरावती येथून सुरु करण्यास नकार दिला आहे. पुणे, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळण्याऐवजी नाराजीचा सामना करावा लागणार आहे. ही गाडी सुपरफास्ट म्हणून पुणे येथे ये- जा करण्यासाठी अधिक सोयीस्कर ठरणारी होती. मात्र खा. रक्षा खडसे यांचा नकार वजा दबावतंत्र यामुळे रेल्वेमंत्री प्रभू कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.असे आहेत गाडीचे थांबेअमरावती-पुणे व्हाया पनवेल जाणाऱ्या रेल्वे गाडीचे आठ रेल्वे स्थानकांवर थांबे देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार अमरावती, बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि पुणे या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबण्याला परवानगी मिळाली होती. परंतु आता रेल्वेमंत्रालय कोणता निर्णय घेते, हे लवकरच स्पष्ट होईल.पुण्याकरिता अगोदरच एकगाडी सुरू असली तरी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता पुण्याकरिता नवीन गाडी सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने रेल्वेमंत्र्यांनी ती पूर्ततादेखील केली. पुणे- भुसावळ ही सुपरफास्ट गाडी अमरावती येथून सुरु करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मात्र खा. रक्षा खडसे यांनी मागणी केली असली तरी त्यांची समजूत काढली जाईल. केवळ स्पर्धा करणे योग्य नाही.- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती.
ंरेल्वे मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
By admin | Updated: May 15, 2015 00:14 IST