शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पाचवी ते आठवीचे पहिल्या दिवशी ५६,७४० विद्यार्थ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या आनुषंगाने बुधवारी ...

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या आनुषंगाने बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात ५६,७४० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविण्याची माहिती शिक्षण विभागाने शासनाला पाठविली आहे.

१४ तालुके आणि महापालिका क्षेत्रातील पाचवी ते आठवीच्या एकूण १९८१ शाळा असून, विद्यार्थी संख्या १७५१९२ एवढी आहे.

शिक्षक ६८७७ एवढे आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या १२०९ आहे. आतापर्यत ४७२२ शिक्षकांनी कोरोना चाचणी केली आहे.

त्यापैकी ५५ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तसेच १२०९ पैकी ९०० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केली असून, ११ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. १९८१ पैकी १९०४ शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी १,७५,१९२ पैकी ५६,७४० विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांची टक्केवारी ३२.३८ एवढी ठरली, तर ९१.०६ टक्के शाळा सुरू झाल्याची नाेंद करण्यात आली.

-------------------------

अशी आहे तालुकानिहाय विद्यार्थी उपस्थिती

अचलपूर-३२३१

अमरावती-५३८९

अंजनगाव सुर्जी-२७६८

भातकुली-२४१७

चांदूरबाजार-५१६२

चिखलदरा-४६९०

चांदूर रेल्वे-२६२५

दर्यापूर-५९८७

धामणगाव रेल्वे-२४२१

मोर्शी-४९६०

तिवसा-२७६२

वरुड-६३३७

अमरावती महापालिका क्षेत्र-१३,३२०