शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

ऑटोतच महिलेचा विनयभंग, बॅग हिसकण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST

अमरावती : फ्लॅटच्या व्यवहारातून ऑटोतच आरोेपींनी महिलेचा विनयभंग केला. तसेच तिच्या हातातील बॅग हिसकण्याचा प्रयत्न केल्याची घटना गाडगेनगर ...

अमरावती : फ्लॅटच्या व्यवहारातून ऑटोतच आरोेपींनी महिलेचा विनयभंग केला. तसेच तिच्या हातातील बॅग हिसकण्याचा प्रयत्न केल्याची घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील पंचवटी चौकात गुरुवारी घडली.

नवसारी परिसरात रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आरोपी गोविंद भीमराव गतफणे (४२, रा. रुक्मिणीनगर परतवाडा), विलास विष्णुपंत जोशी (५३, रा. राजापेठ), प्रवीण अढावू (४३, रा. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी यांचा यातील आरोपी विलास जोशी यांच्याशी परिचय असून, फ्लॅट खरेदी कराव्याचा असल्याने जोशी यांनी फिर्यादीची ओळख गोविंद गतफणेसोबत करून दिली. आरोपींनी फ्लॅटचे इसार घेऊन फसवणूक केल्याचे लक्षात आले. मात्र, आरोपींनी महिलेस पैसे परत करतो, असे सांगून ऑटोत बसवून ऑटो सुरू झाल्यानंतर गोविंद गतफणे याने फिर्यादीचा डावा हाता पिरगळला प्रवीण अढावू याने उजवा हात पकडून विलास जोशी याने बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने आरडाओरड केल्याने पंचवटी चौकात जमलेल्या लोकांनी आरोपीला पकडले. उर्वरित दोेन आरोपी घटनास्थळावरून पडून गेले. तसेच या ठिकाणी गस्तीवरील पोलिससुद्धा आले. आरोपीने फिर्यादीला धमकी देऊन विनयभंग केल्याची तक्रार महिलेने दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.