शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
5
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
6
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
7
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
8
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
9
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
10
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
11
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
12
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
13
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
14
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
15
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
16
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
17
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
18
Guruvar Che Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
19
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
20
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला

वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे पडेल महागात; जावे लागेल तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:28 IST

Amravati : जिल्ह्यातील ३ हजार ग्राहकांची वीज कापली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरण कार्यालयाने थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी वीज बिल भरलेले नाही, अशांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वेळा वीज तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडून हल्ला केल्याच्या घटना घडतात. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात अशा चार घटना घडल्या असून, दोघांविरुद्ध एफआयआर करण्यात आल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली.

महावितरणने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. फेब्रुवारीच्या २० दिवसांत बिल भरण्यास सहकार्य न करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील ३ हजार ८८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. एकूण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही. आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या कालावधीत वसुलीचे महावितरणन कंपनीसमोर आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दोन महिन्यांत महावितरणच्या ४ कर्मचाऱ्यांवर हल्लेजिल्ह्यात मागील दोन महिन्यांमध्ये वीज बिलाच्या वसुलीदरम्यान चार ते पाच कर्मचाऱ्यांवर ग्राहकांनी, तसेच नातेवाइकांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात काहींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात महावितरणची थकबाकी कितीजानेवारी अखेर जिल्ह्यातील कृषी ग्राहक, पाणीपुरवठा व पथदिव्यांचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ११० कोटी ७५ लाखांचा समावेश आहे. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात ३८ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.

परिमंडळात २३१ कोटीची थकबाकीअमरावती परिमंडळा अंतर्गत अमरावती व यवतमाळ असे दोन जिल्हे येतात. या दोन्ही जिल्ह्यात महावितरण कंपनीची २३१ कोटी ५२ लाख रूपयांची थकबाकी वीज ग्राहकांकडे आहे.

काय होऊ शकते हल्लेखोरांवर कारवाई?जर वीज कर्मचाऱ्यावर वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी हल्ला करण्यात आल्यास संबंधित ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो.

हल्लेखोरांवर काय कारवाई करण्यात आली आहे.वीज कनेक्शन तोडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी संबंधित ग्राहकांच्या विरोधात पोलिस कारवाई करण्यात आली आहे.

हल्ल्याचे मुख्य कारण काय?

  • वीज का तोडली : वीज कर्मचाऱ्यांवरील सर्वाधिक हल्ले हे वीज तोडल्यामुळे होते. वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.
  • वारंवार वीज जाणे: उन्हाळ्याच्या ३ दिवसांमध्ये वारंवार वीज जाण्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे यातून होणाऱ्या ग्राहकांमध्ये मनस्ताप वाढून कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडतात.
  • वाढीव वीज बिल : महावितरणकडून अनेक वेळा फॉल्टी मीटरमुळे वाढीव वीज बिल देण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या असतात. यातूनही अनेकवेळा रोष व्यक्त केला जातो.

"ज्या वीज ग्राहकांकडे बिल थकीत आहे, अशांकडून बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी देखील वीज तोडणीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वीज बिल भरून सहकार्य करावे."- दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता 

टॅग्स :electricityवीजAmravatiअमरावती