शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

अंजनगावात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: July 9, 2015 00:08 IST

स्थानिक आठवडी बाजार परिसरातील गोकुळडुसा जिन येथील सिमेंट-लोखंडाच्या व्यापाऱ्यावर त्याच्या घरात शिरून प्राणघातक हल्ला करण्यात आला.

पाच बुरखाधारी सीसीटीव्हीत कैद : संशयित युवतीला अटकअंजनगाव सुर्जी : स्थानिक आठवडी बाजार परिसरातील गोकुळडुसा जिन येथील सिमेंट-लोखंडाच्या व्यापाऱ्यावर त्याच्या घरात शिरून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात व्यापारी गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. घटनेच्या वेळी लढ्ढा यांच्या घरात उपस्थित असलेल्या एका तरूणीला पोलिसांनी परतवाड्याहून ताब्यात घेतले आहे. या तरूणीची कसून चौकशी सुरू आहे. विस्तृत माहितीनुसार कोकर्डा येथील मूळ रहिवासी दीपक लढ्ढा हे स्थानिक आठवडी बाजार परिसरातील गोकुळडुसा जीन येथून सिमेंट-लोखंडाचा व्यापार करतात. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या आरोपींनी लढ्ढा यांना मारहाण करून जखमी केल्याची ही घटना प्रथमदर्शनी दरोड्याचा प्रकार वाटत असली तरी घटनेच्यावेळी लढ्ढा यांच्या घरात युवतीचे उपस्थित असणे आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या आरोपींच्या एकूणच हालचालींवरून हा पूर्वनियोजित घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरुणीचे विसंगत बयाण संशयास्पदलढ्ढा यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चेहरा झाकलेल्या दोन आरोपींसह इतर तीन आरोपींच्या हालचाली दिसून आल्या.लवकरच आरोपींपर्यंत पोहोचण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. तरूणीचे बयाण विसंगत असून संशयास्पद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.दीपक लढ्ढा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या आतडीला खोलवर जखमा झाल्याने त्यांची प्रकृती ४८ तासापर्यंत चिंताजनक आहे.- डॉ. कौस्तुभ सारडा