शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

रवि राणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:45 IST

सिटी बँक घोटाळा प्रकरणाच्या अनुषंगाने खा. आनंदराव अडसूळ यांची जाहीररीत्या बदनामी केल्याच्या कारणावरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी आ. रवि राणा यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला. खा. अडसूळ यांनी दुपारी १.३० वाजता गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून स्वत: तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देअडसुळांनी नोंदविली तक्रार : सिटी बँक प्रकरणात बदनामी केल्याचा आरोप
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सिटी बँक घोटाळा प्रकरणाच्या अनुषंगाने खा. आनंदराव अडसूळ यांची जाहीररीत्या बदनामी केल्याच्या कारणावरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी आ. रवि राणा यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला. खा. अडसूळ यांनी दुपारी १.३० वाजता गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून स्वत: तक्रार नोंदविली.आपल्याविरुद्ध सीबीआय, ईडी किंवा राष्ट्रपती वा लोकसभा अध्यक्षांकडून कसल्याही प्रकारची चौकशी सुरू नाही. असे असताना आ. रवि राणा यांनी सार्वजनिक माध्यमांवर खोटी माहिती प्रसिद्ध करून आपली व खाजगी सचिवांची बदनामी केल्याची तक्रार खा. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पोलीस आयुक्तांकडे केली होती. शिवसेनेचे शहरप्रमुख प्रवीण हरमकर व गटनेता प्रशांत वानखडे यांनी पोलीस आयुक्तांंना भेटून ही तक्रार नोंदविली होती. पश्चात सोशल मीडियावर बदनामीकारक खोटे संदेश पाठवून समाजात आपली प्रतिमा मलीन करणाºया आ. राणा व त्यांना गुन्ह्यात मदत करणाºयांविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार शनिवारी खा. अडसुळांनी गाडगेनगर पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलिसांनी आ. रवि राणा यांच्यासह इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ५००, ५०१, ३४, अ‍ॅट्रासिटीच्या कलम ३, १, पीक्युयूप्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांच्याशी संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.आनंदराव अडसूळ म्हणतात, जनतेसह आयोगाची दिशाभूलबिनबुडाचे आरोप करून त्यांनी जनतेचीच नव्हे, तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचीही दिशाभूल केली आहे. आपल्याविरुद्ध राणा यांनी या आयोगाकडे खोटी तक्रार केली. जातवैधतेच्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणात आपल्या तक्रारीवरून राणा व अन्य जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. ७५० कोटींच्या बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होत असेल, तर राणांनी किमान ९ कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायला हवे होते. विनापुरावा मागासवर्गीय लोकप्रतिनिधीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे, ही निश्चितच गंभीर बाब आहे, त्यांना माझी संपत्ती लिहून द्यायला तयार आहे. त्यांनी त्यांची संपत्ती माझ्या नावे करावी.रवी राणा म्हणतात, ही..दुर्भाग्याची गोष्टखा. आनंदराव अडसूळ अध्यक्ष असणाऱ्या सिटी बँकेच्या नऊ शाखा बंद पडल्या. त्या बँकेचे हजारो गोरगरीब खातेदार हादरले आहेत. त्यामुळे चार खातेदारांचे मृत्यू झालेत. रिझर्व्ह बँकेने सिटी बँकेवर निर्बंध आणलेत. लोकप्रतिनिधी या नात्याने राष्ट्रपतींकडे तक्रार केली. मात्र, खासदाराचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या आमदारावरच गुन्हे दाखल होत असेल, तर ते योग्य नाही. गरिबांच्या न्यायासाठी लढतच राहील. खा.अडसूळ व त्यांचे पीए सुनील भालेराव यांच्या संपत्ती तपासणीची मागणी राष्ट्रपतींकडे लावून धरू. त्यांच्यावर मनी लाँड्रींग कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची मागणी भविष्यात करू. खा. अडसुळांनी जातीचा दुरुपयोग केल्याने कायद्याची बदनामी होत आहे.