शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगड उत्पादकांत चिंतेचे वातावरण; मेहनत। खर्च निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:10 IST

किशोर मोकलकर - आसेगाव पूर्णा : कोरोना महामारीचे संकट, त्यात अवकाळी पाऊस पडल्याने यावर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

किशोर मोकलकर - आसेगाव पूर्णा : कोरोना महामारीचे संकट, त्यात अवकाळी पाऊस पडल्याने यावर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याही परिस्थितीत स्वत:ला सावरत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलिंगड शेती केली. पीकही बहरून आले. मात्र या पिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नाही. तसेच मालाच्या साठवणुकीसाठी गोडाऊन उपलब्ध नसल्याचा फायदा व्यापारी उठवत आहेत. त्यातच कोरोनाने परत डोके वर काढले व पुन्हा लॉक डाऊन लागल्यामुळे व्यापारी शेतकर्‍यांना भीती दाखवत माल खरेदीसाठी येतच नाहीत. यामुळे बहरून आलेले कलिंगडाचे उत्पादन कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ येथील शेतकर्‍यांवर आली आहे.

अचलपूर तालुक्यात सोयाबीन खालोखाल कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये वाल, तूर, मूग, तीळ, उडीद, मटकी, चवळी आदी रब्बी पिके घेतली जातात. परंतु यावर्षी हवामान बदलाचा फटका रब्बी पिकांना बसल्याने ही पीकेही शेतकर्‍यांच्या हातून गेलेलीच आहेत. यातून सावरण्यासाठी कर्ज काढून भाजीपाला, कलिंगड, पपई ही फळशेती करण्याचा प्रयत्न करून सोयाबीन, रब्बी पिकातून झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करून पाहत होता. कलिंगडचे पीकही बहरून आले आहे. मात्र खरेदी करणारे व्यापारी लॉक डाऊनमुळे फिरकतच नसल्याने मातीमोल किमतीत कलिंगडाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाचा लहरीपणा व कोरोना महामारीचे संकट यावर मात करून येथील शेतकर्‍यांनी कलिंगडाची उत्तम शेती केली आहे. पीकही बहरून आले आहे. मात्र योग्य दराने विक्री होत नसल्याची खंत येथील शेतकरी सतीश जवंजाळ यांनी व्यक्त केली.