शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांची कॉलर पकडली; धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:31 IST

स्थळनिरीक्षणासाठी गेलेल्या सहायक आयुक्तांची कॉलर पकडणे, महापालिका आयुक्तांसमोर अर्वाच्य शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जाणे, अभियंत्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुखांशी धक्काबुक्की असा धक्कादायक प्रकार शुक्रवारी महापालिकेत घडला.

ठळक मुद्देमनसे जिल्हाध्यक्षाचा प्रताप : आयुक्तांसमोर अर्वाच्य शिवीगाळ, महापालिका कर्मचाऱ्यांनी पुकारला बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थळनिरीक्षणासाठी गेलेल्या सहायक आयुक्तांची कॉलर पकडणे, महापालिका आयुक्तांसमोर अर्वाच्य शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जाणे, अभियंत्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुखांशी धक्काबुक्की असा धक्कादायक प्रकार शुक्रवारी महापालिकेत घडला. याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष संजय गव्हाळे यांच्याविरुद्ध शहर कोतवाली व राजापेठ पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या. घटनेच्या निषेधार्थ महापालिका कर्मचाºयांनी २ आॅक्टोबरपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी संजय गव्हाळे यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. राजापेठ ठाण्यात दुपारी ३ वाजताच्या सुमारास सहायक आयुक्त प्रशांत शेळके, उपअभियंता गोपाल अटल व सहायक अभियंता यांनी तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, गोपालनगर भागातील नरसिंह सरस्वतीनगर भागातील महापालिकेच्या अभ्यासिकेजवळ स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे. त्यावर गव्हाळे यांचा आक्षेप आहे. त्यांनी याबाबत आयुक्तांकडे तक्रारही नोंदविली. त्यानुसार आयुक्तांनी शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास सहायक आयुक्त प्रशांत शेळके, उपअभियंता गोपाल अटल व सहायक अभियंता श्रीरंग तायडे यांना स्थळनिरीक्षणासाठी पाठविले. तेथे संजय गव्हाळे अचानक आले. व त्यांनी सहायक आयुक्त शेळके यांची कॉलर पकडून त्यांना अश्लील शिविगाळ केली. हाती काठी घेऊन संजय गव्हाळे मारण्याच्या उद्देशााने शेळकेच्या अंगावर धावून गेले.आॅक्टोबरपर्यंत काम बंदअटल व तायडे हे शेळके यांचा बचाव करण्यासाठी सरसावले असता गव्हाळेने दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. येथून निघून जा, अन्यथा पाहून घेण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.या घटनेनंतर गव्हाळे दुपारी १२ च्या सुमारास महापालिका आयुक्त कार्यालयात आले. आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांनी आयुक्तांसमक्ष अर्वाच्य शिवीगाळ केली. त्यावेळी तेथे उपस्थित अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी आयुक्तांच्या अंगाावर धाव घेण्याच्या बेतात असलेल्या गव्हाळेला त्यापूर्वीच पकडले. समजावण्याचा प्रयत्न करत कुत्तरमारे यांनी सुरक्षारक्षकांकरवी गव्हाळेला आयुक्तांच्या दालनाबाहेर आणले. त्यामुळे संतापलेल्या गव्हाळेने गणेश कुत्तरमारे यांना धक्काबुक्की केली. महापालिका आवारात आपल्या वाहनात बसून असलेल्या सहायक आयुक्त प्रशांत शेळके यांना वाहनाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तथा शेळकेच्या चालकाला वाहन चालविण्यास मज्जाव करून त्या वाहनाच्या हवा सोडली, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराची माहिती शहर कोतवाली पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी गव्हाळेला ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचाºयांनी तक्रार नोंदविण्यासाठी शहर कोतवाली गाठले.दरम्यान, दुपारी १ च्या सुमारास याबाबत आयुक्त कार्यालयालगतच्या सभागृहात सर्व अधिकारी कर्मचाºयांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात २ आॅक्टोबरपर्यत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका प्रवेशद्वारासमोर अधिकारी कर्मचाºयांनी तीव्र निदर्शने केलीत. दुपारी ३ वाजता नरसिंग सरस्वतीनगरात घडलेल्या घटनेची तक्रार राजापेठ ठाण्यात दाखल करण्यात आली. त्या तक्रारीवरून गव्हाळेविरुद्ध कलम ३५३, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.सर्वपक्षीय पदाधिकाºयांचा पाठिंबाअधिकारी कर्मचाºयांशी झालेल्या प्रकाराचा निषेध करुन महापालिकेतील सर्वपक्षिय नगरसेवकांनी प्रशासनास जोरकस पाठिंबा दिला. दडपशाहीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देत सर्व पदाधिकारी व नगरसेवक प्रशासनाच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा पुनरुच्चार महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, सभागृहनेता सुनील काळे, स्थायी समिती सभापती विवेक कलोती, माजी महापौर विलास इंगोले व मिलिंद चिमोटे, प्रशांत वानखडे, अजय सारस्कर, अजय गोंडाणे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला. या पदाधिकाºयांनी शहर कोतवाली पोलिसांशी चर्चा केल्यानंतर आयुक्त संजय निपाणे यांचीही भेट घेतली.२ आॅक्टोबरपर्यंत काम बंदवर्षभरापूर्वी उपअभियंता सुहास चव्हाण यांना रुख्मिनीनगर भागात व अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना गोपालनगर भागात मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचा हा प्रकार तिसºयांदा घडला. त्यामुळे अधिकारी कर्मचारी दडपणाखाली काम करीत असून त्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. वारंवार असे प्रकार घडत असल्याने काम करायचे कसे, असा सवाल उपस्थित करत महापालिका अधिकारी कर्मचाºयांनी २ आॅक्टोबरपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले आहे.शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून महापालिकेतील सर्व कार्यालये कडकडीत बंद होती. काम बंद आंदोलन करुन महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हजारावर कर्मचारी एकत्र येत त्यांनी निदर्शने केली. यात उपायुक्त, सहायक आयुक्त, आरोग्य अधिकारी , अभियंते, अधीक्षक, लिपिक असे सर्वच अधिकारी कर्मचारी सहभागी झालेत.सनदशीर मार्गाचा अवलंब न करता अधिकाºयांना मारहाण, त्यांची कॉलर पकडणे, अंगावर धावून जाण्याचा प्रकार निदाजनक आहे. घटनेबाबत महापालिका अधिकारी कर्मचाºयांच्या भावना संतप्त आहेत. मात्र, त्यांनी संपावर जाऊ नये, यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत.- संजय निपाणेआयुक्त, महापालिका