शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

‘अस्पायर एज्युकेशन फेअर’आजपासून

By admin | Updated: June 12, 2014 23:42 IST

विद्यार्थ्यांच्या मनातील करिअर विषयीचा हा संभ्रम दूर करण्यासाठी ‘लोकमत’द्वारे शुक्रवारी १३ ते १५ जूनपर्यंत स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत

'लोकमत'चे आयोजन : शैक्षणिक नगरी एकाच छताखाली, विद्यार्थ्यांसाठी पर्वणीअमरावती : विद्यार्थ्यांच्या मनातील करिअर विषयीचा हा संभ्रम दूर करण्यासाठी ‘लोकमत’द्वारे शुक्रवारी १३ ते १५ जूनपर्यंत स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘एस्पायअर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थेची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती फी भरावी लागणार, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांच्या मनात घोळ निर्माण करीत असतील. मात्र, आता पाल्याच्या करिअरची चिंता करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनीही अभ्यासक्रम निवडीबाबत संभ्रमित होण्याची गरज नाही. कारण, ‘लोकमत’द्वारे विद्यार्थ्यांच्या भावी करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे ‘एस्पायर एज्युकेशन फेअर’ आयोजित केले आहे. हा शैक्षणिक कुंभमेळा विद्यार्थ्यांसाठी प्रचंड फायदेशीर व मार्गदर्शक ठरेल. करिअर घडविण्याचे योग्य दिशादर्शन या कुंभमेळ्यातून मिळणार असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.शिक्षणाविषयी पालक आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध शंकांचे निरसन या प्रदर्शनीच्या माध्यमातून होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, यशस्वी उद्योजक, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेले उच्चपदस्थ अधिकारी प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करतील. याशिवाय महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनीअरिंग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफीक्स, इंटिरियर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, पोलिटेक्निकल, स्पोकल इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट हे घटक प्रदर्शनीत सहभागी होतील. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचेल. त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक संस्थाचालक व व्यावसायिकांना देखील हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत एकाच वेळी त्यांच्या संस्था व प्रतिष्ठानांच्या वाटचालीची माहिती पोहोचविता येईल. प्रदर्शनीत सहभागी होण्यास इच्छूक पालक व विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी जयंत कौलगीकर (९९२२४२७७९४) यांच्यासोबत संपर्क साधावा.