शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आश्रमशाळांच्या ‘स्वयंपाक खोल्या’ विनापरवाना

By admin | Updated: July 20, 2016 23:54 IST

शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमधील स्वयंपाक खोल्या विनापरवाना असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कागदोपत्री हजेरी : मुलींची ‘मासिक’ कुचंबना, अशुद्ध पाणी पुरवठानरेंद्र जावरे परतवाडाशासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमधील स्वयंपाक खोल्या विनापरवाना असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेवनातून विषबाधा झाल्याचा त्याला जबाबदर कोण, हा प्रश्न अनुत्तरीत असून शेकडो मुलींची मासिक कुचंबना सुरू असल्याचे संतापजनक चित्र आहे. शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे. शासनाच्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसल्याचे वास्तव बुधवारी ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली. शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार काही संस्थाचालक करीत असून, शासकीय आश्रम शाळांमध्ये निकृष्ट साहित्याचा पुरवठा आणि धान्याची चोरी ‘आम बात’ असल्याचे दस्तुरखुद्द आदिवासी आता बोलू लागले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आश्रम शाळांमधील स्वयंपाकगृहे अन्न व औषध प्रशासनातर्फे दरवर्षी परवाना काढलेली असणे आवश्यक आहे.विनापरवाना स्वयंपाकगृहेपरतवाडा : शासकीय नियमानुसर फी भरुन घ्यावा लागणरा परवाना आश्रम शाळांनी काढलाच नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. का काढतात परवाना ? स्वयंपाकगृहात कुठल्याही प्रकारची विषबाधा झाली किंवा अपघात झाल्यास हा परवाना नयिमानुसार उपयुक्त ठरतो. तर स्वयंपाकी की मदतनीस यांना काही संसर्गजन्य रोग आहे का, याची तपासणी व तसे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र संबनधित कर्मचाऱ्यांने जोडणे अनिवार्य आहे. मा आश्रम शाळा संहितेला पायदळी तुडवित विना परवाना आश्रमशाळा सुरू असल्याचे चित्र आहे. स्वतंत्र निवास व्यवस्थापन धाब्यावर आश्रम शाळांमधील मुलांची व मुलींची निवास व्यवस्था स्वतंत्ररित्या ठेवण्यात यावी, असे असताना वर्गखोल्यांमध्ये त्याचा रात्री मुक्काम नियमाची एैसीतैशी करणार ठरला आहे. राज्यपालांच्या सचिवांची भेटमहामहिम राज्यापालांचे सचिव परिमल सिंह बुधवारी चिखलदरा तालुक्यात रायपूर आश्रम शाळेला भेट दिल्याचे धारणीचे सहा प्रकल्प अधिकारी एन.के. सोनकांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्यपालांचे सचिव दोन दिवसांपासून मेळघाट दौऱ्यावर आहेत. त्यांना आश्रम शाळेत कुठलीच त्रुटी आढळून येवू नये, यासाठी प्रशासनाने पूर्वीच खबरदारी घेतल्याचे चित्र होते. जलशुद्धीकरण यंत्र नाहीआदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात यावे, हा नियम सुद्धा धाब्यावर असून नदी, नाल्यासह हातपंपाचे दूषित पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागत आहे. आश्रमशाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रच नसल्याचे उघड झाले आहे. मुलींची कुचंबना निवासी आश्रम शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थिनी असल्याने वयात आलेल्या मुलींच्या मासिक पाळीसाठी प्रत्येक आश्रम शाळांमध्ये ‘सॅनटरी नॅपकीन’चा क्वॉईन बॉक्स बसविणे नियमानुसार आवश्यक आहे. परंतु या प्रश्नाकडे शाळा व्यवस्थापन आणि प्रशासकीय शाळा तपासणी अधिकारी पूर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. दहा रुपयांत चार नॅपकीन देण्याचा नियम कायद्यावरच थांबला असून यासाठी मात्र अनुदान लाटण्याची आणि शासकीय आश्रम शाळांमध्ये कागदोपत्री खरेदी करण्याची पद्धत आजही सुरू आहे