शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडवासीयांचे दैवत आशा-मनीषा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:47 IST

- सचिन मानकर दर्यापूर -  चंद्रभागेच्या तीरावरील आशा-मनीषा माता मंदिर व-हाडात प्रसिद्ध आहे. या देवीला पूर्वी हन्सापुरी-मन्सापुरी माता नावाने ओळखले जात असे. वयोवृद्ध भक्त आजही या देवीचा उल्लेख उपरोक्त नावानेच करतात. या देवी मूळच्या राजपुतान्यातील असून पेंढारी जमातीच्या एका भक्ताबरोबर त्या दर्यापुरात आल्या. मूर्तिरूपाने चंद्रभागेच्या तिरावर स्थिरावल्याची आख्यायिका आहे. त्या काळातील ...

- सचिन मानकर दर्यापूर -  चंद्रभागेच्या तीरावरील आशा-मनीषा माता मंदिर व-हाडात प्रसिद्ध आहे. या देवीला पूर्वी हन्सापुरी-मन्सापुरी माता नावाने ओळखले जात असे. वयोवृद्ध भक्त आजही या देवीचा उल्लेख उपरोक्त नावानेच करतात. या देवी मूळच्या राजपुतान्यातील असून पेंढारी जमातीच्या एका भक्ताबरोबर त्या दर्यापुरात आल्या. मूर्तिरूपाने चंद्रभागेच्या तिरावर स्थिरावल्याची आख्यायिका आहे. त्या काळातील देवी भक्तांनी या मंदिराची उभारणी केली. सुमारे ३५० वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर अद्यापही सुस्थितीत आहे. मंदिराच्या भोवताली असलेला कोट व बुरूज ढासळेला आहे. व-हाडचा तिसरा स्वतंत्र राजा दर्या इमाद शाह याने १५२९ मध्ये हे शहर वासविल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यांच्या नावानेच या शहराचे नामकरण दर्यापूर असे झाले. जुन्या वस्तीतील खोलापुरी वेस, देशमुखांचे जुने वाडे आजही त्याची साक्ष देतात. कै.आबासाहेब देशमुख यांच्या वाड्यातून देवी मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याची जाणकारांची माहिती आहे.सन १८७० साली तत्कालीन हैद्राबाद संस्थानकडून रामा गुरव यांना देवी मंदिराची पूजाअर्चा करण्याचे इमानपत्र मिळाले होते. ती वंशपरंपरा आजही सुरूच आहे. दस-याला भाविक देवीला सोने वाहतात.

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७