शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
9
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
10
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
11
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
12
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
13
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
14
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
15
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
16
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
17
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
18
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
19
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
20
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

आकृतिबंध अडकला मंत्रालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:08 IST

महापालिकेचे सेवा प्रवेश नियम २०१६ आणि सुधारित आकृतिबंध मंत्रालयात अडकला असून, प्रशासनाचा पाठपुरावा कमी पडल्याने सहा महिन्यांनंतरही मान्यता मिळालेली नाही.

ठळक मुद्देपदोन्नती थांबली : महापालिका प्रशासनाकडून पाठपुराव्याची कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेचे सेवा प्रवेश नियम २०१६ आणि सुधारित आकृतिबंध मंत्रालयात अडकला असून, प्रशासनाचा पाठपुरावा कमी पडल्याने सहा महिन्यांनंतरही मान्यता मिळालेली नाही. महापौर संजय नरवणे यांच्यापूर्वीही रिना नंदा महापौर असताना आकृतिबंधाला आमसभेने मान्यता दिली होती. मात्र, प्रस्तावात त्रुटी निघाल्या. सप्टेंबर २०१७ मध्ये नव्याने आकृतिबंध मंजुरीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.महापालिकेतील पदभरती, पदोन्नतीची प्रक्रिया आकृतिबंधाला शासनमान्यता नसल्याने थांबली आहे. सप्टेंबर २०१७ च्या आमसभेत अ, ब, क, ड या वर्गनिहाय पदांच्या पुनश्च मंजुरी प्रस्तावास आमसभेने मान्यता दिली. यात वर्ग १ ची चार, वर्ग २ ची नऊ, वर्ग ३ ची ५१५ व वर्ग ४ ची १४६१ पदे होती. त्यानंतर या विषयावर चर्चा होऊन समूह संघटिकांची १० पदे निर्माण करण्याची उपसूचना सभागृहात मांडण्यात आली व सोबतच सभेच्या मान्यतेने वर्ग १ मध्ये १६, वर्ग ब मध्ये १६, वर्क क मध्ये १५५, वर्ग ५ मध्ये १७ अशा २०४ पदे नवनिर्मित करण्यात आली. १९ सप्टेंबर २०१७ च्या आमसभेत सुधारित आकृतिबंध व सेवा प्रवेश नियम २०१६ ला मान्यता मिळाल्यानंतर सर्वंकष प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, सहा महिन्यानंतरही अमरावती महापालिकेतील आस्थापनेत आकृतिबंध व सेवाप्रवेश नियमांना नगरविकास विभागाने मान्यता दिलेली नाही.शासनाकडून मंजुरी अनिवार्यमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४५ ते ५४ नुसार सर्वच कार्यरत पदांचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर करून घेणे आवश्यक आहे. महापालिका आस्थापनेवरील ३८ पदांच्या आकृतिबंधाशिवाय अन्य आकृतिबंधाला अद्याप मान्यता मिळाली नाही. कार्यालय अधीक्षकांनी बनविलेल्या आकृतिबंधावर काम सुरू आहे.२००५ नंतर २०१७ च्या आमसभेत५ फेब्रुवारी २००५ रोजीच्या स्थायी समितीने मान्यता दिलेल्या पदांचे विवरण शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर रिना नंदा महापौर असताना आमसभेत हा प्रस्ताव आला होता. त्यापुढे गतवर्षी सुधारणा केलेला आकृतिबंध आमसभेने मंजूर केला. तो सुधारित व वाढीव पदांचा आकृतिबंध मंजुरीशिवाय अद्यापही पडून आहे.