शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तलवार घेऊन दहशत पसरविणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:13 IST

अमरावती : खोलापुरी गेट ठाणे हद्दीतील गांधी आश्रमाजवळ एक युवक हातात तलावर घेऊन लोकांमध्ये दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांना ...

अमरावती : खोलापुरी गेट ठाणे हद्दीतील गांधी आश्रमाजवळ एक युवक हातात तलावर घेऊन लोकांमध्ये दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवारी घडली. भारत मारोतराव आमटे (३०, रा. गांधी आश्रम) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-----------------

फ्रेजरपुरा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील मंडले गल्लीत विजू मंडे यांच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह ४३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. प्रदीप रामचंद्र सहारे (३०, रा. प्रबुद्धनगर), अरुण रूपरावजी बनसोड (६६, रा. शिक्षक कॉलनी), पप्पू लक्ष्मण इंगोले (४३, रा. श्यामनगर), आकाश दिलीप गोफने(२१, रा. वडाळी), अनिल दादाराव पाठक (४५, रा. जिल्हा परिषद क्वार्टर), रवींद्र वामनराव निंभोरकर (४८, रा. चैतन्य कॉलनी), प्रवेश प्रलय वाघमारे (२४, रा. प्रबुद्ध मंडळ), विजू मंडले (रा. फ्रेजरपुरा) असे आरोपीचे नाव आहे.

---------------------------------------------------------

लक्ष्मीनगरात जुगार पकडला

अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील लक्ष्मीनगर येथे पोलिसांनी कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह ३७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. आरोपी शेख अबरार गोलू शेख सतार, मोहम्मद आसिफ शेख युनिस, सुरेश छाडू निखरे (सर्व रा. लक्ष्मीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

------------------------------------------------------

अवैध दारू पकडली

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी गवळीपुरा येथे कारवाई करून आरोपी भुरू पीरू रायलीवाले (रा. फ्रेजरपुरा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून ५७६० रुपयांची अवैध दारू जप्त केली.