शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कवचकुंडल आटोपले, आता ‘हर घर दस्तक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:01 IST

या अभियानांतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने आशा वर्कर प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देणार आहेत. याद्वारे कुटुंबातील लसीकरण व्हायचे आहे काय, याची माहिती घेणार आहे. याशिवाय लसीकरणाचा टक्का कमी असलेल्या भागात शिबिरेदेखील आयोजित करण्यात येणार आहेत. शहरातील झोपडपट्टी व अस्वच्छ भागात घरोघरी भेट देऊन कोरोना संशयित वा अन्य आजारी व्यक्तींची स्थिती जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना असलेल्या लसीकरणाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी आतापर्यंत मिशन कवचकुंडल अभियान राबविण्यात आले. आता केंद्राच्या आरोग्य विभागाचे ‘हर घर दस्तक’ अभियान ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. या अभियानात सूक्ष्म नियोजनाद्वारे लसीकरणाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने आशा वर्कर प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देणार आहेत. याद्वारे कुटुंबातील लसीकरण व्हायचे आहे काय, याची माहिती घेणार आहे. याशिवाय लसीकरणाचा टक्का कमी असलेल्या भागात शिबिरेदेखील आयोजित करण्यात येणार आहेत. शहरातील झोपडपट्टी व अस्वच्छ भागात घरोघरी भेट देऊन कोरोना संशयित वा अन्य आजारी व्यक्तींची स्थिती जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.मिशन युवा स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शहरात अनेक भागांत लसीकरण शिबिरे नुकतीच आयोजित करण्यात आली आहेत. याशिवाय सामाजिक संस्थांद्वाराही शिबिरे घेण्यात आली आहेत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारेही लसीकरणाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचा टक्का अद्यापही कमी असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात १७.९९ लाख लसवंत जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत १७,९९,१२५ नागरिकांचे लसीकरण झाले. यात १२,२८,२२४ नागरिकांनी पहिला व ५,७०,९०१ नागरिकांनी दोनही डोस घेतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८,७५,०६० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये कोविशिल्ड १५,०१,६३० व कोव्हॅक्सिनचे ३,७३,४३० डोस प्राप्त झाले आहेत.

रविवारी फक्त १० जणांचे लसीकरणदीपोत्सवात लसीकरणाची मोहीम मंदावली आहे. या काळात बहुतांश केंद्रे बंद होती. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, रविवारी जिल्ह्यात फक्त १० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील सहा जण आहेत. पहिला डोस घेतलेल्या बहुतेक नागरिकांचा दुसरा डोस घेण्याचा ८४ दिवसांचा कालावधी व्हायचा असल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या