शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

कपाशीचे क्षेत्र अंशत: वाढणार

By admin | Updated: May 4, 2015 00:26 IST

मागील हंगामात कापसाला मिळालेला अल्प दर, सरासरीपेक्षा कमी पाऊस, अवकाळी व गारपीट यामुळे यंदा कपाशीच्या क्षेत्रात घट...

प्रि-मान्सून निम्म्यावर : यंदा दोन लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीगजानन मोहोड अमरावतीमागील हंगामात कापसाला मिळालेला अल्प दर, सरासरीपेक्षा कमी पाऊस, अवकाळी व गारपीट यामुळे यंदा कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची अपेक्षा होती. मात्र, झाले उलट. यंदा कपाशीचे पेरणीक्षेत्र अंशत: ४ हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी खालवल्याने प्रि-मान्सूनचे पेरणीक्षेत्र मात्र निम्म्यावर राहणार आहे. खरिपाला अवघा एक महिना शिल्लक असल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या हंगामात सुरूवातीपासून हमी भावापेक्षा कापसाला कमी दर मिळाले. त्यावेळी सुरुवातीपासूनच कापसाचे भाव २८०० ते ३००० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते. मार्चनंतर मात्र कापसाने ४ हजार रूपये प्रति क्विंटलपर्यंत मजल मारली. सरकारने बोनस देण्याचे जाहीर केले. परंतुु अद्याप घोषणेची पूर्तता झाली नाही. आता खरिपाचा नवीन हंगाम सुरु होणार आहे. मागील वर्षीच्या बोनसबाबत शासनाकडून अद्याप कोणतीच हालचाल नाही. गेल्या हंगामात सोयाबीन उद्ध्वस्त झाल्याने यंदा कपाशीचे पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वर्षी १ लाख ९७ हजार हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झाली होती. तेवढेच क्षेत्र जवळपास यावर्षीदेखील कायम आहे. २० हजार हेक्टर सोयाबीन क्षेत्र वाढगेल्या हंगामातील सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त झाले. यंदा समाधानकारक पावसाळा असल्याचे हवामान खात्याने म्हटल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोयाबीनवर विश्वास ठेवल्याचे चित्र आहे. मागील वर्षी ३ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून यंदा ३ लाख ४० हजार हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. साडेतीन लाख क्विंटल कपाशी बियाण्यांची गरजयंदा २ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पेरणी क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी किमान साडेतीन लाख क्विंटल कपाशीचे बियाणे लागणार आहेत. खासगी कंपनीद्वारा हे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे. ब.जी.-२ ची ९ लाख ६० हजार पाकिटे लागणार आहेत. तुरीचे क्षेत्र स्थिरयंदा ९९ हजार ५०० हेक्टर तुरीचे पेरणीक्षेत्र प्रस्तावित आहे. गेल्या वर्षी ९८ हजार ८९८ हेक्टर पेरणी क्षेत्र होते. यंदाच्या खरिपातील तुरीचे पेरणीक्षेत्र स्थिर राहणार असल्याचे चित्र आहे. आंतरपिक म्हणूनही तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.