शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राजुऱ्याच्या बँकेत अर्धनग्न आंदोलन

By admin | Updated: June 14, 2016 00:09 IST

बँक प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होत असल्याने ...

कर्ज देण्यास टाळाटाळ : शासनाच्या आदेशाला केराची टोपली राजुराबाजार : बँक प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होत असल्याने युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात बँकेत अर्धनग्न आंदोलन केले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.खरीप हंगामाला सुरुवात होऊन १० ते १२ दिवस लोटले. पावसाने पाठ फिरविली असली तरी मशागत करून ठेवलेली जमीन पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने पीककर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँकांच्या पायऱ्या झिजविण्यापलीकडे ेकाहीच होत नाही. असाच प्रकार राजुराबाजार येथील सेंट्रल बँकेत घडला. शेतकऱ्यांनी येरझरा मारल्या असताना केवळ बँक प्रशासनाच्या हेकेखोर वृत्तीमुळे शेतकरी त्रस्त होवून पीक निघण्यापूर्वीच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी शेकडो शेतकऱ्यांसह बँकेत ठिय्या दिला व अर्धनग्न आंदोलनही केले. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. यावेळी बँक प्रशासनाविरुद्ध नारेबाजी करून शासनाच्या आदेशालाही केराची टोपली दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी शाखा व्यवस्थापक रामटेके यांनी पोलिसांना पाचारण केले. ठाणेदार गोरख दिवे यांनी ताफ्यासह राजुराबाजार येथे दाखल होऊन बँक प्रशासन आणि आंदोलनकर्त्यासोबत चर्चा केली. बँकेतील कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तातडीने शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे तसेच कर्जाचे पुनर्गठन प्रकरणे निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले. १५ दिवसांत कर्ज प्रकरणे निकाली काढण्याचा इशारा देवेंद्र भुयार यांनी दिला. आंदोलनात देवेंद्र भुयारसह सुनील काकडे, जितू बहुरुपी, आेंकार बहुरुपी, मंगेश तट्टे, विनोद डाफे, पिंटू देशमुख, सुधाकर बनसोड, सूरज धांडे, गाजनन सकर्डे, योगेश कासे, गुलाब तट्टे यांची उपस्थित होते.