मंत्रालयात तक्रार : नगरविकास विभागाने मागितला अहवालअमरावती : महापालिकेतील सहायक पशूशल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याची सप्रमाण तक्रार थेट मंत्रालयात करण्यात आली आहे. बोंद्रे यांच्या विरोधातील या तक्रारीची नगरविकास विभागाने दखल घेतली असून महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. सन २०११ पासून कंत्राटी तत्त्वावर सहायक पशूशल्यचिकित्सक म्हणून कार्यरत बोंद्रे यांची त्याच पदावर नियमित नियुक्ती करण्यात आली. शासनमान्यतेनुसार निर्माण झालेल्या सहायक पशूशल्यचिकित्सक पदावर सचिन छगनआप्पा बोंद्रे यांची अनियमित व बेकायदेशीरपणे केलेली नियुक्ती रद्द करावी व नियमानुसार हे पद भरावे, अशी तक्रार वजा विनंती येथील मोहम्मद शाहेद रफिक यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांकडे १८ मे रोजी केली.‘नगरविकास’ने मागितला अहवालअमरावती : ही तक्रार २७ मे रोजी मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे पोहोचल्यानंतर याबाबतचा अहवाल मागविण्याचे निर्देश मंत्रालयस्तरावरुन देण्यात आली.सचिन बोंद्रे यांची कंत्राटीतत्त्वावर निवड होत असताना बोंद्रे यांनी अनुभव प्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती दिली. याशिवाय दोन अनुभव प्रमाणपत्रांमध्ये असलेली माहिती परस्परांशी जुळत नसल्याचे तक्रारकर्त्याने तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या कंत्राटी सेवाकार्यकाळात त्यांना अनेकदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. याखेरीज त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले आहेत. त्यानंतरही सहायक पशूशल्यचिकित्सकाचे पद निर्माण करून कुठलीही भरती प्रक्रिया न राबविता त्यांना थेट नियुक्तीपत्र देण्यात आले. हा सावळागोंधळ तक्रारकर्त्याने माहितीचा अधिकार वापरून उघड केला आहे. कंत्राटी तत्त्वावरील बोंद्रे यांची नियमित सहायक पशूशल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती करताना तत्कालीन आयुक्तांनी नियमावली शासननिर्णय व सर्वोच्च न्यायालयाने अशी पदे भरण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन केले नाही. त्यामुळे विभागीय चौकशी करून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी व निर्माण झालेले पद नियमानुसार भरण्यात यावे, अशी मागणी मो. शाहेद यांनी केली. त्यावर नगरविकास विभागाने अमरावती महापालिका आयुक्तांचा अहवाल मागविला आहे.सचिन बोंद्रे यांनी सन २०११ मध्ये सहायक पशूशल्यचिकित्सक पदासाठी आवेदन करताना खोटी माहिती दिल्याबद्दल मोहम्मद शाहेद रफिक यांनी थेट नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार नोंदविली. त्यावर नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांनी महापालिका आयुक्तांकडून संपूर्ण माहिती मागवली आहे. २० जूनला पाठविलेले हे पत्र आहे. राठोड यांचा तक्रारीच्या अनुशंगाने आपल्या स्तरावर उत्तर देण्यात यावे व त्याची प्रत नगरविकास विभागास सादर करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी केली आहे.उपायुक्तांकडे चौकशीची धुरासहायक पशूशल्यचिकित्सक पदावर अनियमितपणे केलेल्या सचिन बोंद्रेच्या तक्रारीच्या अनुषंगाने मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांनी पाठविलेले पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. बोंद्रे यांच्याविरोधात झालेली प्रकरणाची चौकशी सामान्यप्रशासन विभागाच्या उपायुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. १५ दिवसांत चौकशी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांकडे अभिप्रायासह उपायुक्तांना अहवाल सादर करावयाचा आहे. (प्रतिनिधी)मोहम्मद शाहेद रफिक याच्या विरोधात आमच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल आहेत. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सुडबुद्धीने त्याने तक्रार नोंदविली आहे. माझी नियुक्ती नियमानुकूलच आहे.- सचिन बोंद्रे,सहा.पशूशल्यचिकित्सक
सहायक पशूशल्यचिकित्सक बोंद्रेची नियुक्ती नियमबाह्य !
By admin | Updated: July 2, 2016 00:03 IST