शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

RTE प्रवेशासाठी आजपासून करा ऑनलाईन अर्ज; आदेश धडकले! १७ ते ३१ मे पर्यत 'डेडलाईन'

By जितेंद्र दखने | Updated: May 16, 2024 21:45 IST

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.

जितेंद्र दखने, अमरावती : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने शुक्रवार १७ मे पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे यापूर्वी, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांसोबतच आरटीईतून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक यांचेकडून जारी केलेले आदेश गुरूवार १६ मे रोजी झेडपी शिक्षण विभागात धडकले आहेत.

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र, शिक्षण विभागाने कायद्यात बदल केल्यामुळे केवळ मराठी माध्यमाच्या सरकारी, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार होता. विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा असूनही या शाळांमध्ये विद्यार्थ्याना प्रवेशाची संधी मिळणार नव्हती. या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

न्यायालयाने शासनाच्या ९ फेब्रुवारी २०२४च्या अधिसूचनेला स्थगिती दिली. त्यामुळे जुन्याच पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील २३१ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २ हजार ३६९ जागांवर प्रवेशासाठी १७ ते ३१ मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.पालकांनी वर दिलेल्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बुध्दभुषण सोनवने यांनी केले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीRight To Educationशिक्षण हक्क कायदा