अमरावती : सत्र २०२०-२१ मधील आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्जप्रक्रिया ३ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्ह्यात यंदा २४४ शाळांच्या २०७६ जागा उपलब्ध झाल्या आहेत. पालकांना २१ मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांची नोंदणी २१ ते ३० जानेवारी या कालावधीत करण्यात आली. त्यानुसार जिल्हाभरातील २४४ शाळांनी नोंदणी केली. आता या शाळांमध्ये २५ टक्के राखीव असलेल्या रिक्त जागावर प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येणार आहे.
बॉक्स
तालुकानिहाय उपलब्ध जागा
अचलपूर १७२, अमरावती २७४, अंजनगाव सुर्जी १०३, भातकुली ६५, चांदूर बाजार १०९, चिखलदरा ५, चांदूर रेल्वे ४६, दर्यापूर १३७, धारणी १८, धामणगाव रेल्वे ८५, मोर्शी १४९, नांदगाव खंडेश्वर ४७, तिवसा ५४, वरूड १५५, अमरावती महापालिका क्षेत्र ६५७ अशा २०७६ जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.