शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

‘आॅनलाईन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज

By admin | Updated: February 25, 2015 00:32 IST

मे आणि आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी २६ फेब्रुवारी रोजी पहिली प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

नरेंद्र जावरे अचलपूरमे आणि आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी २६ फेब्रुवारी रोजी पहिली प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या ३९८ जागांसाठी १८५ केंद्रावरुन निवडणूक घेतली जाणार आहे. पहिल्यांदा उमेदवारीला नामांकन अर्ज व खर्चाची नोंद आॅनलाईन भरुन द्यावी लागणार असून तशी तयारी प्रशासनातर्फे सुरू आहे.अचलपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या संपूर्ण ३९२ व पाच ग्रामपंचायतीच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ९ मार्च पर्यंत त्यावर हरकती बोलाविण्यात येतील व १४ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केल्या जाणार आहे. नावात बदल, विधानसभा निवडणूक यादीत नाव असणे किंवन गहाळ होणे, दोन वार्डात नाव अशा तीन प्रकारच्या तक्रारींचा निपटारा या कालावधीत केला जाईल. त्यासाठी ग्रामीण मतदारांनी आपल्या हरकती वेळेत दाखल करण्याचे आवाहन तहसीलदार मनोज लोणारकर यांनी केले आहे.लोकप्रतिनिधींसाठी प्रतिष्ठेचीअचलपूर तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती अचलपूर, मेळघाट व दर्यापूर मतदार संघात येत असल्याने तिन्ही आमदारांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. अचलपूर मतदार संघातील ११, दर्यापूरातील ९ तर सर्वाधिक मेळघाट मतदार संघात येणाऱ्या अचलपूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या सर्व जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे. आ. बच्चू कडू, आ. रमेश बुंदिले व आ. प्रभुदास भिलावेकर यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आ. केवलराम काळे आदी नेते नागरिकांच्या सतत संपर्कात आहे. निवडणुकीच्या तयारीची धूम सुरु आहे.पाच ग्रामपंचायतीत पोटनिवडणूकनारायणपूर, सालेपूर, कोल्हा, शिंदी बु. हरम, वडगाव फत्तेपूर, मल्हारा, रासेगाव, बोर्डी, परसापूर, टवलार, हनवतखेडा, गौरखेडा, बोवापूर, नायगाव, खाजमातगर, इसापूर, एकलासपूर, कांडली, खैरी, कोष्ठा बु., धोतरखेडा, येवता, दर्याबाद, येसूर्णा, बोरगाव दोरी, थुगाव, घोडगाव, चौसाळा, सावळापूर, निजामपूर, बोरगाव पेठ, अंबाडा कंठरी, निमकुुंठ, निंभारी, पथ्रोट, धामणगाव गढी, कुष्ठा खुर्द, वडनेर भुजंग, वझ्झर, पांढरी, कविठा बु. येथे सर्व जागांसाठी तर निमदरी, बेलखेडा , कासमपूर, पिंपळखुटा, भिलोना या पाच ग्रामपंचायतींच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.