तिवसा नगरपंचायत : जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस, पुनर्निवड प्रक्रियेची मागणीतिवसा : तिवसा नगरपंचायतीत विषय समिती सदस्य निवड प्रक्रियेत पीठासीन अधिकारी एस.जी. मून यांनी नियमांचा एकतर्फी वापर करून चुकीचा निर्णय दिल्याच्या मुद्यावरून नगरपंचायतीच्या सत्तापक्षाचे गटनेते रामदास मेहश्रे, उपाध्यक्ष वैभव वानखडे, सदस्य मधुकर भगत यांनी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडे गुरुवारी अपील दाखल केले. पार पडलेली निवड प्रक्रिया रद्द करून ती नव्याने राबविण्यात यावी, अशी मागणी अपिलात करण्यात आली आहे. नियमानुसार, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. तिवसा नगरपंचायतीच्या बुधवारी झालेल्या पहिल्या बैठकीत विषय समिती गठित करण्याचे ठरले. समिती चार करायच्या की पाच याविषयी मंथन झाले. सर्व सहमतीने पाच समित्या गठित करण्याचे सभागृहात ठरले. यामध्ये स्थायी, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व महिला व बालकल्याण अशा पाच विषय समिती सदस्यांसाठी नामनिर्देशनपत्र पिठासीन अधिकारी एस. जी. मून यांनी मागविले. सत्तारूढ गटाचे तीन व विरोधी गटाचे दोन असे सदस्य समितीत राहणार, याला सभागृहाने संमती दर्शविली. सत्तारुढ गटाचे प्रमुख रामदास मेहश्रे यांनी समिती अध्यक्षांची नावे पीठासीन अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी तीन सदस्यांची नावे मागविली. मात्र अर्जावर जागा शिल्लक नसल्याने त्यांच्याच सहमतीने अर्जाच्या मागील बाजूस या गटप्रमुखांनी नावे दिलीत.
सत्तापक्षाचे अपील
By admin | Updated: December 11, 2015 00:32 IST