अमरावती : बनावट दस्तऐवजांच्या आधारे सीमकार्ड खरेदी करणाऱ्या अज्ञाताविरुध्द तसेच सिमकार्ड विक्रेत्यावर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदविला. आतापर्यंत जिल्ह्यात ७ प्रकरणांत बनावट सीमकार्ड धारकांविरुध्द गुन्हे नोंदविले आहेत. पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात दहशतवाद विरोधी सेलचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एम. खलसे, एएसआय राजेंद्र पंचगाम, पोलीस जमादार मोहन मोहोड, पोलीस कर्मचारी सुधीर पांडे व श्याम गावंडे यांनी बनावट सीमकार्ड प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जिल्ह्यातील बनावट सिमकार्ड धारकांची पडताळणी मोहिमेत एक बनावट सीमकार्ड पोलिसांना आढळून आले. तिवसा तालुक्तातील शेंदूरजना माहुरे येथील रहिवासी विजय मारोती मोरे यांच्या ओळखपत्राचा वापर करून अज्ञात इसमाने एका कंपनीचे सीमकार्ड खरेदी केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सिमकार्डचे रिटेलर विक्रेत्याकडे बनावट व खोट्या स्वाक्षरीच्या आधारे अज्ञात इसमाने सीमकार्ड अॅक्टिव्ह केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी विक्रेता व अज्ञात सीमकार्ड धारकाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
बनावट सीमकार्ड प्रकरणी आणखी एक अटकेत
By admin | Updated: October 18, 2015 00:39 IST