शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

तपोवनमध्ये आणखी एक बलात्कार

By admin | Updated: December 21, 2014 22:50 IST

‘तपोवन’ येथील मुलींच्या वसतिगृहातील अनाथ मुलीवर बलात्काराची शाई वाळत नाही तोच या बालगृहातील दुसऱ्या मुलीवरही अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीने गाडगेनगर

महिनाभरातील दुसरी घटना : पीडित मुलीची गाडगेनगर पोलिसांकडे तक्रारअमरावती : ‘तपोवन’ येथील मुलींच्या वसतिगृहातील अनाथ मुलीवर बलात्काराची शाई वाळत नाही तोच या बालगृहातील दुसऱ्या मुलीवरही अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी तपोवन परिसरात एका १४ वर्षीय अनाथ मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारा संस्थेचा पदाधिकारी गजानन चुटे यालाही गजाआड करण्यात आले. हे प्रकरण चौकशीत असतानाच आणखी एका मुलीवर बलात्काराची घटना २० डिसेंबर रोजी उघड आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तपोवनमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील एका खोलीत नेऊन पुन्हा एका १५ वर्षीय अनाथ मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तपोवन येथील एका कर्मचाऱ्याने पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून बलात्कार केल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यांत दाखल झाली आहे. आरोपी हा वसतिगृहात काम करणारा काका असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले असून अद्यापपर्यंत आरोपीचे नाव समोर आलेले नाही. पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७६(२)(डी)(आय), लैंगिक अपराध, बालसरंक्षण आणि नियम-२०१२-४, ६, ८, १०, १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)