शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांचा छळ; अमर सर्कस कायमस्वरुपी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:42 IST

राज्यभरात प्रसिद्ध अमर सर्कस पूर्णपणे बंद पडली असून, जनावरांवरील अत्याचारांची तक्रार वन्यप्रेंंमी मंगळवारी कोतवाली पोलिसात नोंदविली. पोलिसांनी पक्षी व प्राण्यांना घेऊन जातानाच ट्रक पकडण्यात आला आहे.

ठळक मुद्देवन्यप्रेमींची पोलिसांत तक्रार : गुन्हा दाखल, पक्षी, प्राणी वाहून नेण्याचा बेत फसलां

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यभरात प्रसिद्ध अमर सर्कस पूर्णपणे बंद पडली असून, जनावरांवरील अत्याचारांची तक्रार वन्यप्रेंंमी मंगळवारी कोतवाली पोलिसात नोंदविली. पोलिसांनी पक्षी व प्राण्यांना घेऊन जातानाच ट्रक पकडण्यात आला आहे.सायंस्कोर मैदानात काही महिन्यांपूर्वी अमर सर्कस सुरू झाली होती. मात्र, काही महिन्यांतच जागेच्या भाड्याचा वाद पुढे आला. जिल्हा परिषदेच्या शाळा प्रशासनाकडून सर्कस संचालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हाही नोंदविण्यात आला. व्यवसायात तोटा आल्याने सर्कस बंद करण्यात आली. मात्र, सर्कशीत काम करणाऱ्या मनुष्य व प्राण्यांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. सोमवारी रात्री इंद्रप्रताप सुभाष ठाकरे (रा.साईनगर) यांच्यासह प्राणीप्रेंमीनी सायंस्कोर मैदानात जाऊन प्राण्यांची हिरीरीने पाहणी केली असता त्यांना विदारक चित्र दृष्टीस पडले. प्राणी उपाशी व काही प्राणी जखमी अवस्थेत आढळले. याबाबत त्यांनी रात्री कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी सर्कशीच्या व्यवस्थापकाला नोटीस बजावून प्राण्यांवर औषधोपचार करण्यास सुचविले. मात्र, यासंदर्भात पोलीस कारवाई न झाल्याचे पाहून मंगळवारी इंद्रप्रताप ठाकरे यांच्यासह काही वन्यप्रेमींनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांची भेट घेतली. सर्कसमध्ये प्राण्यांवरील अत्याचार व त्यांची दयनीय स्थिती सीपींसमोर मांडली. त्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेत पोलीस उपायुक्त निवा जैन यांना निर्देश देऊन कारवाई करण्यास सांगितले. पोलिसांनी तत्काळ कारवाईसाठी पाऊल उचलले. तोपर्यंत सर्कसमधील प्राणी नागपूरला नेले जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी प्राणी घेऊन जाणाºया ट्रकला एसआरपीएफ कॅम्प परिसरात अडविले. त्यानंतर सर्व प्राण्यांंना पुन्हा सायंस्कोर मैदानात आणण्यात आले. त्यांची पशुधन विकास अधिकारी कुळकर्णी यांनी वैद्यकीय तपासणी केली. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तक्रारीच्या अनुषंगाने कोतवाली पोलिसांनी प्राण्यांना निर्दयी वागणूक प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(एच)(आर) नुसार गुन्हा नोंदविला.मनेका गांधींनी साधला सीपींशी संवादअमरावतीमधील अमर सर्कशीतील प्राण्यांच्या दयनीय अवस्थेची माहिती स्थानिक प्राणी संस्थांना पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संघटनेच्या प्रमुख ना. मनेका गांधी यांना दिली. या अनुषंगाने त्यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला. वन्यप्राणीप्रेमी इंद्रप्रताप ठाकरे यांच्यासह सागर मैदानकर, शुभम सायंके आदींनी प्राण्यांवरील अत्याचाराला वाचा फोडली. या प्रकरणात ते पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या भेटीला गेले. त्यावेळी मेनका गांधी यांनी सीपींशी संवाद साधल्याचे इंद्रप्रताप ठाकरे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.जखमी उंट गेला कुठे?सर्कशीत एका उंटाला मधुमेह झाला होता. त्याच्या पाठीवर मोठी जखम झाली होती. प्राण्यावर अत्याचार होत असल्याची तक्रार झाल्यानंतर सर्व प्राण्यांना नागपूरला हलविण्याची तयारी सुरू झाली. प्राण्यांना ट्रकमध्ये टाकून रवाना करण्यात आले. पोलिसांनी ट्रक पकडला. मात्र, त्यात जखमी उंट आढळला नाही. तो उंट कुठे गेला, याबाबत संशय व्यक्त होत आहे.सर्कस चालविताना विविध अडचणींचा सामना करावा लागल्याने ती कायमस्वरुपी बंद केली. काही मनुष्यबळाला रोजगार आमच्याकडून दिला जात आहे. प्राण्यांना नागपूरला उपचारार्थ पाठविले जाईल.- नीरज गाडगे, अमर सर्कसचे मालक